विस्तृत विधायक काम करावे
By Admin | Updated: January 19, 2016 01:46 IST2016-01-19T01:46:43+5:302016-01-19T01:46:43+5:30
समाजात सामाजिक बांधिलकीतून कामकाज करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर थाप म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

विस्तृत विधायक काम करावे
दौंड : समाजात सामाजिक बांधिलकीतून कामकाज करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर थाप म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले ही निश्चितच समाधानाची बाब आहे. तेव्हा पुरस्कारार्थींनी पुरस्काराचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपले सामाजिक काम विस्तृत केले पाहिजे, असे मत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले.
दौंड मेडिकल असोसिएशनच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. दौंड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. समीर कुलकर्णी यांनी असोसिएशनचा सामाजिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय कामाचा प्रास्ताविकात आढावा घेतला. या वेळी वीरधवल जगदाळे, वासुदेव काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी समादेशक संजय शिंत्रे, समादेशक बोराडे, डॉ. जयसिंग थोरात, डॉ. श्यामराव कुलकर्णी, डॉ. अशोक पाटील, डॉ. राहुल जगदाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. मीना भट्टड, पल्लवी कुलकर्णी, रवी पवार यांनी सूत्रसंचालन केले.
दौंड मेडिकल असोसिएशनच्या वतीने दोन दिवस घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आरोग्यविषयक चर्चासत्र झाले. चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. डी. एस. लोणकर यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. एल. एस. बिडवे, राजाभाऊ कुलकर्णी, डॉ. समीर कुलकर्णी, डॉ. जयसिंग थोरात उपस्थित होते.
चर्चासत्रात डॉ. क्षितिजा कुलकर्णी, डॉ. संजीव करंडे, डॉ. शलाका करंडे, डॉ. प्रेमकुमार भट्टड, चैतन्य जोशी, डॉ. सुमीत शहा, डॉ. प्रवीण गांजणे यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दौंड मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्यांचे सहकार्य मिळाले.
पहिल्या दिवशी मनोहर बोडखे यांचा ‘हास्यतडका’ हा विनोदी कार्यक्रम झाला. त्यानंतर चैत्राली अभ्यंकर यांचा हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम, तर दुसऱ्या दिवशी शकीर शेख यांचा सांस्कृतिक गायनाचा कार्यक्रम झाला.