शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वेश्याव्यवसायातून परदेशी तरुणींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 02:47 IST

वैद्यकीय व्हिसावर आलेल्या दोघा परदेशी तरुणींच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार कोंढवा पोलिसांनी उघडकीस आणला आहे़

पुणे : वैद्यकीय व्हिसावर आलेल्या दोघा परदेशी तरुणींच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार कोंढवा पोलिसांनी उघडकीस आणला आहे़ पैशासाठी त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्याविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले, की कोंढव्यातील शालिमार इमारतीत परदेशी मुलींना ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार तोगे यांना समजली़ त्यांनी ही बाब गुन्हे पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांना कळविली़ कुंभार यांनी शुक्रवारी एक पथक तयार केले़ बनावट गिºहाईकाला संबंधित मोबाईलवर फोन करायला सांगून वेश्याव्यवसायासाठी मुली पुरविल्या जात असल्याची खात्री केली़ त्यानंतर त्यांना शालिमार इमारतीत पाठविण्यात आले़ बनावट ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी तेथील फ्लॅटवर पोलीस निरीक्षक महादेव कुंभार, सहायक फौजदार देशमुख, हवालदार तोगे, नाईक, थोरात, गावडे, मुकाडे, कोळेकर यांनी छापा टाकला़या फ्लॅटमध्ये दोन युगांडा येथील महिला आढळून आल्या़ त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी आपण ६ महिन्यांपूर्वी वैद्यकीय व्हिसावर भारतात आले आहोत़ औषधोपचारासाठी पैशाची आवश्यकता असल्याने त्यांना वेश्याव्यवसायातून चांगले पैसे मिळू शकतील, असे सांगून आमच्याकडून तो वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे सांगितले़ पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हा