शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
2
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
3
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
4
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
5
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
6
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
7
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
8
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
9
“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
10
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
11
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
12
पहिल्याच दिवशी ७३% भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट दाखवतोय ₹२५५ चा फायदा, पाहा कोणता आहे आयपीओ?
13
वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
14
Hero चा धमाका! ४ ते १० वर्षीय मुलांसाठी लॉन्च केली नवी E-Bike; किंमत पाहून थक्क व्हाल
15
Lionel Messi: फुटबॉलचा 'GOAT' मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
16
भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचं थैमान, या चार खेळांडूंना केलं, सस्पेंड, FIRही दाखल
17
Messi India Tour: १०० कोटींचे जेट, १०० कोटींचे घर... लियोनेल मेस्सीची नेटवर्थ किती? फुटबॉलचा जादूगार भारताच्या दौऱ्यावर
18
अरेरे! इन्स्टावरचं प्रेम पडलं महागात; बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दिल्लीहून रायबरेलीला आली पण...
19
'धुरंधर'मधल्या या अभिनेत्रीला लूक्सवरुन ऐकावे लागलेले टोमणे, नाक आणि दात बदलण्याचा मिळालेला सल्ला
20
आलिशान घर, राईस मिल, पेट्रोल पंप... अधिकाऱ्याकडे सापडलं ४० लाखांसह कोट्यवधींचं घबाड
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2024 : आज तुम्हीच नायक; म्हणूनच आपला मताधिकार बजावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 08:53 IST

निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार वाटेल ते करतील, पण खरे नायक तुम्ही आहात. आज तुम्हीच निर्णायक आहात.

पुणे : आपलं मत कोणत्याही उमेदवारांच्या भवितव्याचा कधीही फैसला करत नाही. तर, हा फैसला असतो तुमच्या-माझ्या भवितव्याचा! सध्या प्रश्न आहे आपल्या शहराचा! आणि सवाल आहे उद्याच्या पिढ्यांच्या भवितव्याचा.

भविष्याची स्वप्नं दाखवणारा प्रचार परवा संध्याकाळी थांबला आणि आता सगळी सूत्रे तुमच्या हातात आली आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार वाटेल ते करतील, पण खरे नायक तुम्ही आहात. आज तुम्हीच निर्णायक आहात. हा देश कोणा एकाच्या मालकीचा नाही. या देशाची अंतिम सत्ता सर्वसामान्य माणसाची आहे. या सर्वसामान्य माणसाचं एक मत सगळं काही बदलवण्याची ताकद ठेवतं. म्हणूनच आज आपला मताधिकार बजावा.जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत आज मतदान होत आहे. या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचेच काय, देशाचे लक्ष आहे. सत्ताधारी पक्षासाठी आणि विरोधकांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. साधारणपणे निवडणुका एवढ्या चुरशीच्या होत नाहीत. ही निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरली आहे. प्रत्येक मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार झाला. स्टार प्रचारकांनी इथेच तळ ठोकला होता. आणि, आज मतदान होत आहे. शेवटी अंतिम कौल तुमचाच असणार आहे. कारण खरे सत्ताधीश तुम्ही आहात.तुमच्या भविष्यावर प्रभाव मतदानातून पडत असतो, त्यामुळे अशा वेळी केलेली एखादी चूकही नंतर महागात पडू शकते. एखादी साधी गोष्ट निवडताना आपण किती विचार करतो? असा निर्णय घेताना किती बारकावे तपासतो? इथे तर आपल्याला आमदार निवडायचा आहे. आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी. तुमचा प्रतिनिधी म्हणून, तुमच्या वतीने, तुमच्यासाठी तो तुमचे प्रश्न मांडणार आहे. तुमचे मुद्दे सभागृहात पोहोचवणार आहे. इथेच चूक झाली तर त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागणार आहे.पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महानगरांचा एकत्रित विचार केला तर सुमारे एक कोटी लोकसंख्या आहे. शिक्षण, संस्कृती, आयटी, उद्योग यांचे माहेर असणारी ही महानगरे. या शहरांमध्ये संधी अमाप आहेत. आणि, तेवढीच आव्हानेही आहेत. ही आव्हाने पेलता आली नाहीत, तर उद्याचा काळ कठीण असणार आहे!

उद्या ही महानगरे बकाल आणि बेताल झाली तर त्याचे खापर नेत्यांवर फोडून चालणार नाही. कारण ही जबाबदारी तुमची आहे. तुम्ही योग्य नेते का निवडले नाहीत, असे प्रश्न उद्याच्या पिढ्या विचारणार आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक तुम्हाला ‘लढवायची’ आहे. लोकप्रतिनिधी काही काळापुरते सत्तेत येतील; पण अंतिम सत्ता मतदारांची असते. तशी ती असेल तर अधिकारांसोबत जबाबदारीदेखील येते. म्हणूनच मतदान कराच.

- संजय आवटे संपादक

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Votingमतदान