महिला दिव्यांगांना निवडणूक कामातून वगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:07 IST2021-01-01T04:07:40+5:302021-01-01T04:07:40+5:30

मंचर : जानेवारी २०२१ मध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक कामातून महिला, दिव्यांग आणि आजारी शिक्षकांना वगळण्याची मागणी आंबेगाव तालुका प्राथमिक ...

Exclude women with disabilities from election work | महिला दिव्यांगांना निवडणूक कामातून वगळा

महिला दिव्यांगांना निवडणूक कामातून वगळा

मंचर : जानेवारी २०२१ मध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक कामातून महिला, दिव्यांग आणि आजारी शिक्षकांना वगळण्याची मागणी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर व सरचिटणीस सुनील भेके यांनी तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

१५ जानेवारी रोजी आंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून त्यासाठी प्राथमिक शिक्षकांची कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात येणारआहे.सदर नेमणूका करताना महिला शिक्षिका, दिव्यांग आणि गंभीर आजारी शिक्षक यांना निवडणूक कामातून वगळण्याची मागणी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे गुरुवारी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.

यावेळी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर, सरचिटणीस सुनिल भेके, कार्याध्यक्ष संजय केंगले, नेते विजय घिसे, प्रवक्ते विजय डोके, राज्य संघाचे उपाध्यक्ष महेश बढे, राज्य कार्यकारिणी सदस्य निलेश मिडगे, बाळासाहेब सैद, बाळासाहेब साबळे, राजेंद्र चासकर,राजाराम काथेर,भरत सोमवंशी उपस्थित होते. चौकट :- आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या या मागण्यांना तहसीलदार रमा जोशी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून शंभर टक्के महिला शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.तसेच अपंग,गंभीर आजारी शिक्षक व दिर्घ मुदतीच्या रजेवर असलेल्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याचे आश्वासन शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

--

चौकट

--

प्राथमिक शिक्षिकांना सवलत देऊन माध्यमिक शिक्षकांची नेमणुक करा

त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने अपंग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्याबाबत यापूर्वी अनेकदा सूचित केलेले असून तरीही दिव्यांग शिक्षकांना निवडणूक कामासाठी नियुक्त केले जाते. निवडणुकीसाठी कमी कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासनार आहे त्यामुळे कर्मचारी नेमणूक करताना प्राथमिक शिक्षकांबरोबर आवश्यकता भासल्यास माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांची तसेच इतर विभागातील पुरुष कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नेमणूक केल्यास सर्व महिला कर्मचारी, दिव्यांग व आजारी कर्मचारी यांना निवडणूक कामातून वगळणे शक्य होईल.

--

३१ मंचर निवडणूक शिक्षक

फोटोखाली: आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तहसीलदार रमा जोशी यांना निवेदन देताना शिक्षक संघाचे शिष्टमंडळ

Web Title: Exclude women with disabilities from election work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.