जीवनावश्यक यादीतून कांदा, बटाटा वगळा

By Admin | Updated: July 21, 2014 22:54 IST2014-07-21T22:54:54+5:302014-07-21T22:54:54+5:30

केंद्र सरकारने कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून व निर्यातमूल्य वाढवून शेतक:यांची मोठी अडचण केली आहे.

Exclude the onion, potato from the vital list | जीवनावश्यक यादीतून कांदा, बटाटा वगळा

जीवनावश्यक यादीतून कांदा, बटाटा वगळा

केंदूर : केंद्र सरकारने कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून व निर्यातमूल्य वाढवून शेतक:यांची मोठी अडचण केली आहे. शासनाच्या या निर्णयाने शेतकरीवर्गात संतापाची लाट निर्माण झाली आहे. 
शासनाच्या या निर्णयानंतर खैरे यांनी शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतक:यांशी संवाद साधला असता, शेतक:यांमध्ये निर्णय विरोधी वातावरण आहे. यास योग्य हमीभाव न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतक:यांनी दिला आहे. कांदा व बटाटा शेतक:यांचे नगदी पीक असून, याच पिकाच्या उत्पादनावर शेतक:याच्या संसाराचे आर्थिक अंदाजपत्रक अवलंबून असते. शासनाच्या अशा धोरणामुळे जानेवारी ते मेदरम्यान कांदा हा मातीमोल दरानेच विकला जात आहे. 
शेतक:यांना आधुनिक वखारीत साठा करता येत नसल्याने याचा फायदा व्यापारीवर्गाला होत आहे. त्यामुळे कांदा व बटाटय़ाच्या उत्पादन खर्चाचा विचार करून शेतक:यांना बाजारभाची शाश्वती देऊन दोन ते तीन हजारांचा हमी भाव देण्याची मागणीही त्यांनी केली. (वार्ताहर)
 
4कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तुंच्या यादीत टाकण्याच्या सरकारच्या निर्णयाने शेतकरी वर्गात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या निर्णयाचा फेरविचार करून कांदा व बटाटय़ाला उत्पादन खर्चाचा विचार करून हमी भाव द्यावा व निर्यातमूल्य घटवावे; अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे नेते बाळासाहेब खैरे यांनी दिला आहे. 
4कांदा जीवनावश्यक नसल्याने शासनाने कांद्याचा व बटाटय़ाचा या यादीत समावेश करण्याचा हा निर्णय अपूर्ण माहितीने घेतला आहे. उत्पादक शेतक:यांची कैफियत शासनाने समजून घेतली नाही, हा निर्णय म्हणजे शेतक:यांची अडवणूक करणारा आहे. शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 
 

 

Web Title: Exclude the onion, potato from the vital list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.