नसरापूर गावाला प्रतिबंधित क्षेत्रातून वगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:12 IST2021-05-06T04:12:24+5:302021-05-06T04:12:24+5:30

नसरापूर येथे गेल्या ५ मार्चपासून कोरोना रुग्ण संख्या केवळ ५३ असून या यादीत नसरापूर व्यतिरिक्त पंचक्रोशीतील गावातील रुग्णांनी नसरापूर ...

Exclude Nasrapur village from the restricted area | नसरापूर गावाला प्रतिबंधित क्षेत्रातून वगळा

नसरापूर गावाला प्रतिबंधित क्षेत्रातून वगळा

नसरापूर येथे गेल्या ५ मार्चपासून कोरोना रुग्ण संख्या केवळ ५३ असून या यादीत नसरापूर व्यतिरिक्त पंचक्रोशीतील गावातील रुग्णांनी नसरापूर गावचे रहिवासी म्हणून उल्लेख झाला आहे. त्यामुळे विनाकारण नसरापूर येथे रुग्ण संख्येत वाढ होऊन रुग्ण संख्येचा फुगवटा झाल्याने नसरापूर गावाला प्रतिबंधीत क्षेत्रात घेतल्याने येथील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत असे ग्रामपंचायतीच्या सनियंत्रण समितीने भोर प्रांताधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे.

याकरिता नसरापूर ग्रामपंचायतीने शासनाच्या आकडेवारीनुसार अँटिजन टेस्ट केलेल्या रुग्णांशी संपर्क साधले असता त्यावेळी काही रुग्ण नसरापूर गावचे नसल्याचे आढळून आले आहेत,तर काही रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याकरिता रुग्णांच्या यादीची पडताळणी होऊन गाव प्रतिबंधित क्षेत्रातून कमी करण्यासाठी पडताळणी अंती निर्णय व्हावा, अशी विनंती प्रांताधिकारी भोर यांना करण्यात आली आहे.

अँटिजन टेस्ट करताना संबंधित व्यक्ती कोणत्या गावची रहिवासी आहे याचा सबळ पुरावा तपासला पाहिजे.

रोहिणी शेटे ,

सरपंच,ग्रामपंचायत नसरापूर.

Web Title: Exclude Nasrapur village from the restricted area