शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
4
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
5
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
6
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
7
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
8
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
9
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
10
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
11
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
12
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
13
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
14
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
15
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
16
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
17
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
18
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "निलेश लंके तू किस झाड की पत्ती है..." अजित पवार यांचा इशारा
20
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'

खळबळजनक! दौंडमध्ये हॉटेल व्यावसायिकाची रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2021 4:33 PM

या घटनेने श्रीगोंदा आणि दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये हॉटेल व्यावसायिकाने रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव दादा लक्ष्मण नलगे असे आहे. दौंड पोलीस ठाण्याशेजारील तारामती इमारतीमध्ये शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी गोळी झाडत आपली जीवन यात्रा संपवली आहे. पोलिसांनी आजारपणामुळे त्यांनी हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.   

श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नलगे यांचा मुलगा असलेल्या दादा नलगे यांनी दौंड येथील राहत्या घरी स्वतःच्या रिव्हॉलरमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आमदार बबनराव पाचपुते यांचे निकटवर्तीय म्हणून देखील नलगे कुटुंबाची ओळख आहे. दादा नलगे यांच्यामागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ, बहीण, वहिनी असा परिवार आहे. या घटनेने श्रीगोंदा आणि दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड पोलीस ठाण्यात दादा नलगे यांच्या आत्महत्येची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. तसेच  नलगे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. 

टॅग्स :daund-acदौंडPoliceपोलिसDeathमृत्यूPoliticsराजकारणBabanrao Pachaputeबबनराव पाचपुतेShrigondaश्रीगोंदा