लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लोकमत समूहाने आयोजित केलेल्या शैक्षणिक प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी मुबलक माहिती मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे, अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम आहे, असे गौरवोद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी काढले. पुढच्या वर्षीपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही या प्रदर्शनामध्ये सहभागी होईल, असे त्यांनी सांगितले.‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाने द युनिक अॅकॅडमी प्रस्तुत ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर - २०१७’चे उद्घाटन डॉ. नितीन करमळकर, द युनिक अॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव, सुरेखा अॅडव्हर्टायझिंगचे संचालक सचिन पाटील व अजय मोरे, दिशा अॅडव्हर्टायझिंगचे संचालक रवी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाव्यवस्थापक (जाहिरात) राकेश मल्होत्रा उपस्थित होते.नितीन करमळकर म्हणाले, ‘‘पुण्याबरोबरच राज्यात १५ ठिकाणी हे शैक्षणिक प्रदर्शन लोकमतच्या वतीने भरविले जात आहे. त्याचबरोबर दुर्गम भागातही लोकमतने अशी प्रदर्शने भरवावीत. तिथल्या विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाचा चांगला फायदा होऊ शकेल.’’ कर्वेनगरच्या डीपी रोडवरील पंडित फार्म्स येथे हे शैक्षणिक प्रदर्शन रविवार, दि. ११ जूनपर्यंत सकाळी १० ते सायं. ७ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या शैक्षणिक प्रदर्शनामध्ये नामांकित शैक्षणिक संस्था, तिथे चालणाऱ्या अभ्यासक्रमाची व प्रवेशप्रक्रियेची इत्थंभूत माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध शैक्षणिक संस्थांबरोबर अनेक शैक्षणिक क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शकांतर्फे विविध विषयांवर विनामूल्य मार्गदर्शन सत्राचे आयोजनही करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रदर्शनाचा स्तुत्य उपक्रम
By admin | Updated: June 10, 2017 02:25 IST