परीक्षा केंद्र दुप्पट केल्या ‘सीए’ परीक्षा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:09 IST2020-11-28T04:09:21+5:302020-11-28T04:09:21+5:30
‘आयसीएआय’च्या परीक्षा व उपक्रमांबाबत बजाज यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. संस्थेच्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे, यशवंत कासार, कौन्सिलचे ...

परीक्षा केंद्र दुप्पट केल्या ‘सीए’ परीक्षा सुरळीत
‘आयसीएआय’च्या परीक्षा व उपक्रमांबाबत बजाज यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. संस्थेच्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे, यशवंत कासार, कौन्सिलचे सचिव मुतुर्झा काचवला, पुणे शाखेचे अध्यक्ष अभिषेक धामणे, उपाध्यक्ष समीर लड्डा, सचिव काशिनाथ पठारे आदी उपस्थित होते. सीएच्या परीक्षेबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये चिंता होती, असे सांगत बजाज म्हणाले, ‘कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व दक्षता घेऊनच परीक्षा सुरू आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन स्वरूपात अभ्यासाचे साहित्य दिले गेले. संस्थेच्या सदस्यांनी या काळात परिश्रम घेत मदतीचा हात पुढे केला. विविध नाविण्यपुर्ण बदलांसाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.’ चितळे यांनीही परीक्षांसाठी संस्थेकडून केल्या जात असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती दिली. कोरोना काळात अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ‘आयसीएआय’कडून सुचना दिल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
-------