नारायणगावातील आरोग्य शिबिरात ३५५ रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:11 IST2021-07-31T04:11:05+5:302021-07-31T04:11:05+5:30

डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक प्रा. डॉ. पंजाब कथे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी ...

Examination of 355 patients in Narayangaon health camp | नारायणगावातील आरोग्य शिबिरात ३५५ रुग्णांची तपासणी

नारायणगावातील आरोग्य शिबिरात ३५५ रुग्णांची तपासणी

डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक प्रा. डॉ. पंजाब कथे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आ. अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माऊली खंडागळे, लायन्स क्लबचे अध्यक्ष संपत शिंदे व सेक्रेटरी नरेंद्र गोसावी, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, दिलीप गांजळे, वैद्यकीय अधिकारी वर्षा गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्या स्नेहल कांकरिया यांनी शुभेच्छा दिल्या.

आरोग्य तपासणी शिबिरासाठी लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड येथील डॉ. शार्दूल सोमण, डॉ. विशाल क्षीरसागर, डॉ. शिल्पा क्षीरसागर, डॉ. ध्रुव लष्करे, डॉ. मितेश नेमाडे, डॉ. वैशाली पोटे, डॉ. साधना गुप्ता आणि डॉ. शारदा आतकरी, सहदेव गोळे, नारायणगाव व परिसरातील डॉ. इमरान शेख, डॉ. प्रीतम तीतर, डॉ. अर्चना सुरवसे तीतर, डॉ. मनोहर डोळे, डॉ. पिंकी कथे, प्रा. डॉ. पंजाब कथे यांचे मार्गदर्शन लाभले.

शिबिराचे नियोजन रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष शिवाजी टाकळकर, सचिव रवींद्र वाजगे, खजिनदार नंदकुमार चिंचकर, आयपीपी अंबादास वामन, उपाध्यक्ष श्रीकांत फुलसुंदर, प्रोजेक्ट डायरेक्टर शामराव थोरात यांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात आले.

या वेळी राम भालेराव, नारायण आरोटे, रामभाऊ सातपुते, सुकाजी मुळे, उमेश भालेराव, शिवाजी कुमकर, उषा टाकळकर, वैशाली फुलसुंदर, अश्विनी थोरात, पुष्पलता डोंगरे, संगीता ढमाले, सीमा कुमकर, स्वाती थोरात, मनीषा मुळे व ऊर्मिला वाजगे उपस्थित होते.

---

फोटो क्रमांक : ३०नारायणगाव आरोग्य शिबिर

मोफत आरोग्य तपासणी शिबिरात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. पंजाब कथे.

Web Title: Examination of 355 patients in Narayangaon health camp