माजी नगरसेवकांना मोफत वैद्यकीय साह्य
By Admin | Updated: November 11, 2014 23:57 IST2014-11-11T23:57:19+5:302014-11-11T23:57:19+5:30
अनेक माजी नगरसेवकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने, त्यांना महापालिकेतर्फे 1क्क् टक्के मेडिकल साह्य देण्याचा निर्णय स्थायी समितीने आज घेतला.

माजी नगरसेवकांना मोफत वैद्यकीय साह्य
पुणो : अनेक माजी नगरसेवकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने, त्यांना महापालिकेतर्फे 1क्क् टक्के मेडिकल साह्य देण्याचा निर्णय स्थायी समितीने आज घेतला. त्यामुळे, विद्यमान नगरसेवकांप्रमाणोच माजी नगरसेवकांचे हॉस्पिटलचे संपूर्ण बिल महापालिकेतर्फे दिले जाणार आहे. यापूर्वी हा प्रस्ताव दाखल झाला. त्या वेळी तो वादग्रस्त ठरला होता.
शहरातील काही माजी नगरसेवकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना औषधोपचार घेता येत नाही. त्यामुळे महापालिकेकडून 1क्क् टक्के वैद्यकीय साह्य देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती. उपमहापौर आबा बागुल यांनी त्याविषयीचा प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीपुढे ठेवला होता. महिला बालकल्याण समितीच्या मंजुरीनंतर हा विषया स्थायी समितीपुढे मंगळवारी ठेवण्यात आला. महापालिकेच्या माजी नगरसेवकांना आतापर्यंत वैद्यकीय साह्य योजनेतून 5क् टक्के सवलत दिली जात होती. यापुढे त्यांना वैद्यकीय उपचाराचे संपूर्ण बिल देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने एकमताने मंजुरी दिली, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे यांनी दिली.(प्रतिनिधी)
नवीन गाडीवरून ‘स्थायी’ची माघार..
दोन वर्षापूर्वी महापौर व उपमहापौर यांच्या सेवेत नवीन गाडय़ा देण्यात आल्या होत्या. परंतु, नवीन महापौर व उपमहापौरांना पुन्हा नवीन गाडी घेण्याच्या प्रस्तावाला ऐनवेळी स्थायी समितीत मान्यता देण्यात आली होती. शहरातील कच:याचा प्रश्न गंभीर असताना, घनकच:याच्या निधीचे गाडीसाठी वर्गीकरण होणार होते. परंतु, टीका झाल्याने महापौर दत्तात्रय धनकवडे व उपमहापौर आबा बागुल यांनी गाडी स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे स्थायी समितीने नवीन गाडी खरेदी करण्याचा निर्णय आज मागे घेतला.
वादग्रस्त ठरणार ?
गेल्या दोन वर्षापूर्वी माजी नगरसेवकांना 1क्क् टक्के वैद्यकीय साह्य देण्याचा विषय आला होता. त्या वेळी स्वयंसेवी संस्थांनी त्याला प्रचंड विरोध केल्याने प्रस्ताव बारगळला होता. ज्या काही माजी नगरसेवकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. केवळ त्यांच्या आर्थिक निकषांवर 1क्क् टक्के उपचार द्यावेत. परंतु, सरसकट सर्व माजी नगरसेवकांना 1क्क् टक्के साह्य देण्याचा विषय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
महापौर चीन दौ:यावर
चीनमधील ङोंगसू या शहरामध्ये 15 ते 18 नोव्हेंबर या काळात होणा:या परिषदेसाठी महापौरांना निमंत्रित करण्यात आले आहे. महापालिकेकडून महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्यासह नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांना पाठविण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.