आजी-माजी नगराध्यक्षांमध्ये वाद?

By Admin | Updated: June 18, 2014 00:11 IST2014-06-18T00:11:00+5:302014-06-18T00:11:00+5:30

बारामती शहरातून ‘आयडिया’ कंपनीला भूमिगत केबल टाकण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठी हट्ट धरलेल्या माजी नगराध्यक्षांची विद्यमान नगराध्यक्षांबरोबर चांगलीच खडाजंगी झाली

Ex-city municipality dispute? | आजी-माजी नगराध्यक्षांमध्ये वाद?

आजी-माजी नगराध्यक्षांमध्ये वाद?

बारामती : बारामती शहरातून ‘आयडिया’ कंपनीला भूमिगत केबल टाकण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठी हट्ट धरलेल्या माजी नगराध्यक्षांची विद्यमान नगराध्यक्षांबरोबर चांगलीच खडाजंगी झाली. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारातदेखील त्याचे पडसाद उमटले. पवार यांनीच त्या वादावर पडदा पाडला. या पार्श्वभूमीवर बारामतीत ‘रिलायन्स’ने ‘आयडिया’वर मात केल्याची चर्चा मात्र जोरदार रंगली.
याच पार्श्वभूमीवर ‘रिलायन्स’प्रमाणे ‘आयडिया’ कंपनीनेदेखील केबल टाकण्यासाठी परवानगी मागितली. त्यासाठी मध्यस्थी म्हणून माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांना हाताशी धरले. मुख्याधिकाऱ्यांनी सभागृहाच्या मंजुरीशिवाय परवानगी देता येणार नाही. ‘रिलायन्स’ला परवानगी दिल्यामुळे वाद झाल्याचे निदर्शनास आणले. काल सोमवारी याच अनुषंगाने माजी नगराध्यक्ष पुन्हा मुख्याधिकाऱ्यांना भेटले. मुख्याधिकाऱ्यांनी नकार दिल्याने त्यांनी थेट नगराध्यक्षांचे कार्यालय गाठले. नगराध्यक्षांनी देखील परस्पर खोदाईला परवानगी देता येणार नाही, अशी भूमिका घेतल्याने दोघांमध्ये खडाजंगी झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Ex-city municipality dispute?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.