ईव्हीएम प्रकरणातील उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली
By Admin | Updated: March 10, 2017 05:07 IST2017-03-10T05:07:50+5:302017-03-10T05:07:50+5:30
महानगरपालिकेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याप्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी विधानभवनासमोर उपोषण करणाऱ्या तिघा उमेदवारांची

ईव्हीएम प्रकरणातील उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली
पुणे : महानगरपालिकेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याप्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी विधानभवनासमोर उपोषण करणाऱ्या तिघा उमेदवारांची गुरुवारी तब्येत खालावली. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्याचबरोबर इतरही उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याच्या प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ५ मार्च २०१७ पासून काही पराभूत उमेदवार व माहिती अधिकाराचे कार्यकर्ते बेमुदत उपोषणास बसले आहेत. आज उपोषणाचा पाचवा दिवस होता. उपोषणकर्त्यांपैकी भरत कांबळे, हानिफ शेख व शैलेंद्र भोसले यांची तब्येत खालावल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्यांसदर्भात शासनस्तरावर कार्यवाही करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केले आहे.