शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

रिकाम्या कसब्यावर सर्वांचाच डोळा : भाजपात सर्वाधिक इच्छुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 14:45 IST

भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक भाजपाचेच आहेत. आत शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही कसबा लढवण्याची तयारी चालू केली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेसह काँग्रेसचीही तयारी

पुणे : कसब्यातून पाचवेळा आमदार म्हणून निवडून आलेले गिरीश बापट खासदारपदी निवडून गेल्याने हा विधानसभा मतदारसंघ रिकामा झाला आहे. त्यामुळे भाजपासह विरोधी पक्षातील अनेकांचा कसब्यावर डोळा आहे. भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक भाजपाचेच आहेत. आत शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही कसबा लढवण्याची तयारी चालू केली आहे.शहराच्या मध्यभागातील पेठा हे या मतदारसंघाचे वैशिष्ट्य आहे. आता लोकमान्य नगर, राजेंद्रनगर तसेच पर्वती पायथ्याचा काही भाग जोडला गेला आहे. शहरातील अन्य मतदारसंघांच्या तुलनेत कसबा क्षेत्रफळाने कमी, मतदारसंख्येने कमी (फक्त २ लाख ९० हजार मतदार), प्रचारासाठी तुलनेने करावा लागणारा खर्च कमी, पेठांचा परिसर असल्याने परिचयाचे मतदार मात्र जास्त अशी याची वैशिष्ट्ये आहेत.शिवसैनिकांना कोणत्याही स्थितीत हा मतदारसंघ हवा आहे. गेली अनेक वर्षे भाजपा कसब्यातून निवडून येत आहे. बापट सलग २५ वर्षे आमदार म्हणून निवडून येत आहेत. सन १९७८ नंतर अपवाद म्हणून उल्हास काळोखे आणि वसंत थोरात यांनीच फक्त हा मतदारसंघ काँग्रेसला मिळवून दिला आहे. उर्वरित प्रत्येक वेळी अरविंद लेले, अण्णा जोशी व सलग ५ वेळा बापट यांनी कसब्यावर भाजपाचेच शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळेच भाजपातून या मतदारसंघासाठी सर्वाधिक इच्छुक आहेत.महापौर मुक्ता टिळक या सर्वात मोठ्या दावेदार आहेत. त्यानंतर हेमंत रासने, धीरज घाटे, गणेश बीडकर, महेश लडकत या नगरसेवकांनी तर अशोक येनपुरे, दिलीप काळोखे या माजी नगरसेवकांना उमेदवारी मागितली आहे. या सर्वांवर कडी करेल असे नाव बापट यांच्या स्नुषा स्वरदा यांचे आहे. त्या सांगली महापालिकेच्या माजी नगरसेवक असून विवाहानंतर आता गेली २ वर्षे पुण्याच्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. बापट यांच्या मनात आहे ते होईल की निर्णय थेट प्रदेशकडून होईल यावर भाजपाचे उमेदवारी कोणाला मिळेल हे अवलंबून आहे.दरम्यान शिवसेनेच्या वतीने नगरसेवक विशाल धनवडे यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. युती असली तरी किमान एक मतदारसंघ व तोही कसबाच शिवसेनेला द्यावा अशी जाहीर मागणीच त्यांनी केली आहे. ते याबाबत इतके आग्रही आहेत की त्यांनी मंगळवारी सायंकाळी अंगारकी चतुथीर्चा मुहुर्त साधत कसबा गणपतीचे दर्शन घेत थेट जाहीर प्रचारालाच सुरूवात केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मतदारसंघाचे दान माज्या झोळीत टाकतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.दुसरीकडे काँग्रेसचे पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, सहयोगी सदस्य असलेले नगरसेवक रविंद्र धंगेकर, लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी, माजी नगरसेवक गोपाळ तिवारी हेही काँग्रेसकडून हा मतदारसंघ मागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहर उपाध्यक्ष असलेले अशोक राठी यांच्यासह आणखी काहीजण इच्छुक आहेत. मतदारसंघाच्या रचनेमुळे सर्वांनाच हा मतदारसंघ जिंकण्यासाठी म्हणून सोयीचा वाटत असून त्यामुळेच सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच दिसते आहे.  

टॅग्स :Puneपुणेkasba-peth-acकस्बा पेठElectionनिवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेना