शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

मी केले, मी केले... असा अहंकार नको : मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 21:11 IST

गीताधर्म मंडळाच्या गीतादर्शन मासिकाचा सुवर्ण महोत्सव वर्षारंभ आणि स्मरणिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

पुणे : जे काम करता ते समरस होऊन करा. पण त्यात अडकू नका. आपण जे काम करतो त्यामागे पुष्कळ लोक असतात. आपण करतो तेच चांगले असेल, असे मानू नये. मी केले, मी केले असा अहंकार बाळगण्यात अर्थ नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी केले.               गीताधर्म मंडळाच्या गीतादर्शन मासिकाचा सुवर्ण महोत्सव वर्षारंभ आणि स्मरणिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकूंद दातार, कार्यवाह, विजया मेहेंदळे, कार्यकारिणी सदस्य वसुधा पाळंदे, मुकूंद कोंढवेकर व मोरेश्वर जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. पाळंदे यांना यावेळी भागवत यांच्या हस्ते पहिला सरस्वतीबाई आपटे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

               भागवत म्हणाले, कोणतेही राष्ट्र नीती, सरकार, माणूस किंवा पार्टीवर उभे राहत नाही. समाज जोपर्यंत गीतेचे आचरण करून तसेच बनत नाही, तोपर्यंत अपेक्षित राष्ट्र उभे राहणार नाही. आम्ही संघात सांगतो की, जे करता ते समरस होऊन करा. पण त्यात न अडकू नका. आणीबाणीमध्ये एका शाखेचा प्रचारक असताना खुप काम केले. पण त्यावेळी असे वाटले नव्हते की संघाचे असे दिवस येतील. प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. त्यासाठी कर्तव्य करत राहावे. फळ काय मिळेल याचा विचार करू नये.              उग्र माणसे लवकर प्रसिध्द होतात. प्रत्येक विषयावर उगीचच, अधिकार नसताना बोलायचे नसते. ते जमत नसेल तर मौन बाळगावे. पण त्यासाठी भाव शुध्द असावा लागतो. संविधानाच्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द नंतर टाकले. पण एका न्यायमुर्ती म्हटले आहे की, हे संविधानात गृहितच धरले आहे. हे शब्द टाकल्याने उघड झाले. भारतवर्षात सर्व विश्व कुटूंब मानण्याची परंपरा आहे. हेच संविधानाचेही रुप आहे. त्याचा उपयोग देश चालविण्यासाठी केला पाहिजे. गीतेमध्ये सांगितलेला धर्म विश्वधर्म आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपासून चालत आले आहे. त्यानुसार सृष्टी चालणार आहे. कुणी काही केले तरी असेच होणार आहे, असे भागवत यांनी नमुद केले. 

... तर शंभरपट रुपात विश्वगुरू गीतेमध्ये सर्व निरुपण धर्माचे आहे. गीतेनंतर आजतागायत ज्या विचारधारा आल्या, ते सगळे गीतेमध्ये आहे. त्यामुळे गीता अभ्यासली पाहिजे. आचरणात आणली पाहिजे. सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याची तपस्या केली तरी देश आजच्या शंभरपट रुपात विश्वगुरू म्हणून पुढे येईल, असे मोहन भागवत यांनी सांगितले

टॅग्स :PuneपुणेMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा