शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

शहरात होतेय दररोज एका बलात्काराची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:28 IST

शहरात दररोज एका अल्पवयीन मुलीवर अथवा महिलेवर बलात्कार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे : शहरात दररोज एका अल्पवयीन मुलीवर अथवा महिलेवर बलात्कार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असून, गेल्या सात वर्षांत या गुन्ह्यांच्या संख्येत चौपट वाढ झाली आहे. समाजमाध्यमांमधून देखील बदनामी केल्याच्या तक्रारींमध्ये तीन वर्षांतच पाचपटींहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे.समाजमाध्यमांद्वारे मैत्री वाढवून जवळीक साधून बलात्कार करणे, लग्नाच्या आमिषाने बलात्कार करण्याच्या घटनांत वाढ नोंदविण्यात येत आहे. अशा घटनांमध्ये नातेवाईक, ओळखीच्या लोकांचाच जास्त भरणा आहे. काही घटनांत तर जन्मदाता अथवा सावत्र पितादेखील असल्याचे समोर आले आहे.शहरात २०१०मध्ये अल्पवयीन मुलींवरील ८९ अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यात २०१७ अखेरीस तब्बल ३४९ घटनांपर्यंत वाढ झाली आहे. अशा घटनांत २०१५नंतर मोठी वाढ नोंदविली गेली. शहरात २०१५मध्ये २८० आणि २०१६मध्ये ३५४ गुन्हे नोंदविले गेले आहेत.समाजमाध्यमांचा वापर जसा वाढत आहे, तसा तेथील तक्रारींच्या संख्येतदेखील वाढ नोंदविण्यात येत आहे. शहरात समाजमाध्यमांद्वारे मुलींची बदनामी केल्याच्या अवघ्या १५२ तक्रारी दाखल झाल्या होत्या. डिसेंबर २०१७अखेरीस तब्बल ८८५ तक्रार अर्ज दाखल झाल्याची नोंद सायबर क्राईम विभागाकडे झाली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती समोर आणली आहे. अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या संख्येची स्वतंत्र नोंद पोलिसांकडे होत नसल्याचे माहिती अधिकारातून दिसून येत आहे. तसेच, महिला अथवा मुलींची बदनामी केल्याच्या घटनांचीदेखील स्वतंत्र नोंद ठेवण्यात आलेली नाही.>सायबर विभागाकडे गतवर्षी ८८५ अर्जसमाजमाध्यमांत महिला आणि व्यक्तीची बदनामी झाल्याच्या तक्रारीतही वेगाने वाढ होत आहे. सायबर विभागाकडे २०१४पर्यंत अशा तक्रारींची नोंद ठेवण्यात येत नव्हती. त्यानंतर २०१५मध्ये १५२ तक्रार अर्ज सायबर क्राईम विभागाकडे प्राप्त झाले. पुढे २०१६मध्ये ५५२, २०१७मध्ये८८५ अर्ज दाखल झाले. तर, १५ जानेवारी २०१८ पर्यंत १६ तक्रार अर्ज दाखल झाले आहेत.>पास्को कायद्याचीकडक अंमलबजावणी आवश्यकशासनाने पुराव्याचा कायदा याकडे दुर्लक्ष करून पास्को कायदा आणला आहे़ त्यातील तरतुदी कडक आहेत़ आरोपीला जामीन मिळण्यातही त्यात अनेक कडक निर्बंध घातले आहेत़ या कायद्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविली़ शासन व पोलिसांनी त्याची कडक अंमलबजावणी केली तर अशा घटनांवर नियंत्रण बसू शकेल़- अ‍ॅड़ एऩ डी़ पाटील>वर्ष दाखल गुन्हे२०१० ८९२०११ ७८२०१२ ८५२०१३ १६८२०१४ १८९२०१५ २८०२०१६ ३५४२०१७ ३४९

टॅग्स :PuneपुणेMolestationविनयभंग