दर मंगळवारी कोरडा दिवस
By Admin | Updated: October 29, 2014 00:00 IST2014-10-29T00:00:54+5:302014-10-29T00:00:54+5:30
बारामती शहरात पसरलेल्या डेंग्यूच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी (दि. 28) कोरडा दिवस पाळण्यात आला.

दर मंगळवारी कोरडा दिवस
बारामती : बारामती शहरात पसरलेल्या डेंग्यूच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी (दि. 28) कोरडा दिवस पाळण्यात आला. शहर, ग्रामीण भागात डेंग्यूच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुख्याधिकारी दीपक ङिांजाड यांनी नगरपालिकेच्या कर्मचा:यांच्या पथकासह शहरात सकाळी 7 वाजता जाऊन पाणी साठे कोरडे केले. तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजना, दक्षतेबाबत नागरिकांशी संवाद साधला.
गेल्या 3 महिन्यांपासून बारामती शहरात डेंग्यूचे रुग्ण सातत्याने आढळत आहे. नगरसेवक, महावितरणचे कर्मचारी, पोलीस अधिका:यांसह शहरातील अनेक नागरिकांना डेंग्यूला सामोरे जावे लागले आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रुग्णांमध्ये वाढ होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे.
मुख्याधिकारी ङिांजाड यांनी या मोहिमेबाबत ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, डेंग्यू
आटोक्यात येई र्पयत दर मंगळवारी शहरात कोरडा दिवस पाळण्यात येईल. प्रतिबंधात्मक उपाय योजना, दक्षतेबाबत नागरिकांना माहिती घरोघरी जाऊन देण्यात येत आहे. आज सकाळी 7 ते 9 या वेळेत ही मोहीम स्वतंत्रपणो राबविण्यात आली आहे. डेंग्यूबाबत नागरिकांशी पत्रके आदी माध्यमातून माहिती देऊन संवाद साधण्यात येत आहे. या शिवाय शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. गवत वाढलेल्या भागात नगरपालिका प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे.
धुराळणी करून डासांचा प्रादूर्भाव रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. तालुका आरोग्य अधिकारी
डॉ. महेश जगताप म्हणाले, प्राथमिक, ग्रामीण रुग्णालयात या आजाराच्या उपचाराची सुविधा उपलब्ध
करून देण्यात आली आहे. कर्मचा:यांमार्फत सव्र्हेक्षण सुरू आहे. हा मानवनिर्मित आजार आहे. या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी डेंग्यू आजाराला कारणीभूत ठरणा:या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रभावीपणो नियंत्रण ठेवावे.
(वार्ताहर)
4डेंग्यूच्या वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मुख्याधिकारी ङिांजाड सकाळी 7 वाजताच 5क् ते 6क् नगरपालिका कर्मचा:यांच्या पथकासह कसाब गल्ली, श्रवण गल्ली, बारामती गावठाणात पोहोचले. या ठिकाणी कर्मचा:यांनी घरोघरी जाऊन डेंग्यू आजाराला कारणीभूत ठरणा:या डासांच्या आळ्यांची तपासणी केली. तसेच, साठवलेले पाणी ओतून पाण्याची भांडी, बॅरल कोरडे केले. मंगळवारी कोरडा दिवस पाळण्यात आला.