शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

देशसेवा म्हणून प्रत्येकाने एक झाड लावावे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 19:31 IST

आम्ही एक हजारहून अधिक झाडे लावली आहेत. मनात आणले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

ठळक मुद्देश्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे ‘माझा दवाखाना, माझं झाड’ अभियानपर्यावरणाचा प्राण असलेल्या झाडांचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी डॉक्टरांनी घेतला पुढाकार

पुणे : आम्ही एक हजारहून अधिक झाडे लावली आहेत. मनात आणले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यासाठी इच्छाशक्ती प्रबळ हवी. यंदाच्या वर्षी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड केली जाणार आहे. आपण प्रत्येकाने हा प्रयत्न केला पाहिजे. देशसेवा म्हणून प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे आणि ते जगवले देखील पाहिजे, असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले. श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझा दवाखाना, माझं झाड’ या अभियानाचा शुभारंभ पर्वती पायथा येथील बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानाबाहेर झाला. यावेळी डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक, डॉ. सुनील जगताप, आयोजक प्रा. डॉ. राजेंद्र खेडेकर, डॉ. रवींद्र काटकर, डॉ. मंगेश खटावकर, डॉ.श्रीकांत बेलगमवाकर, डॉ. उज्ज्वला हाके, डॉ. सचिन पवार, डॉ. कुमार कोद्रे, विजय जोशी, डॉ. संगीता खेनट, आशिष जाधव, डॉ. शंतनु जगदाळे, सागर बारदेसकर, बालकलाकार श्रीश आणि दर्श खेडेकर आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. राजेंद्र खेडेकर म्हणाले, ‘दवाखाना चालविणारकया प्रत्येक डॉक्टरांनी आपल्या दवाखान्यासमोर एक झाड लावून ते संपूर्णपणे वाढविण्याची जबाबदारी घ्यावी, ही यामागील संकल्पना आहे. सध्या होणारा पर्यावरणाचा ऱ्हास दूर करत निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रातील ३ हजार डॉक्टर पुढाकार घेत आहेत. दवाखाना चालविणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांनी आपल्या दवाखान्यासमोर एक झाड लावून ते संपूर्णपणे वाढविण्याची जबाबदारी घ्यावी, ही यामागील संकल्पना आहे. यादृष्टीने महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर भागांतील डॉक्टर्स यामध्ये सहभागी होणार आहेत.’ पर्यावरणाचा प्राण असलेल्या झाडांचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. डॉक्टरांनी आपल्या दवाखान्यासमोरील जागा निवडून तेथे खड्डा व इतर व्यवस्था केल्यास संस्थेतर्फे त्यांना विनामूल्य झाडे पुरविण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील ३० वैद्यकीय संघटना या अभियानात सहभागी झाल्या आहेत. राज्यातील मोठी हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांना देखील या उपक्रमात सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेenvironmentवातावरण