शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

येळकोट येळकोट जय मल्हार! जेजुरी गडावर दररोज २० हजार भाविकांना मिळणार दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 15:31 IST

दहा वर्षाखालील आणि ६५ वर्षावरील भाविकांना तसेच गरोदर स्त्रियांना मंदिर प्रवेश नाही

ठळक मुद्देमंदिर उघडल्याने व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण

जेजुरी : घटस्थापनेपासून शासनाच्या आदेशानुसार नियम व अटी पळून जेजुरीचे खंडोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होत आहे. शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करीत दररोज २० हजार भाविकांना देवदर्शन दिले जाणार असल्याचे मार्तंड देव संस्थांकडून कळवण्यात आले आहे. 

उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर जेजुरीचा खंडोबा देवदर्शनासाठी खुले होत आहे. शासनाने या संदर्भात  कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करीत भाविकांना देव दर्शन देण्यात यावे असे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार मार्तंड देव संस्थांन चे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे यांनी विश्वस्त मंडळाची नुकतीच बैठक घेतली होती.

 बैठकीत भाविकांना देव दर्शन देण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे. उद्या सकाळी घटस्थापनेनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन रांगेतूनच योग्य ते अंतर ठेवून देवदर्शन घेता येणार आहे. भाविकांना केवळ मुख दर्शनच मिळणार असून भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाही. त्याच बरोबर दररोजचे कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी केवळ देवाचे सेवक, पुजारी यांच्याकडून करण्यात येणार आहेत. होणारा नवरात्रोत्सव, आणि दसरा उत्सव देवाचे आठवडेकरी पुजारी,नित्य सेवेकरी, मानकरी यांच्या कडून धार्मिक विधी करून घेतले जाणार आहेत. 

दहा वर्षाखालील आणि ६५ वर्षावरील भाविकांना तसेच गरोदर स्त्रियांना मंदिर प्रवेश नाही 

भाविकांसाठी उत्तर महाद्वारातून मंदिरात प्रवेश दिला जाणार असून पश्चिम महाद्वारातून बाहेर जावे लागणार आहे. भाविकांना मास्क आणि सॅनिटायझर ची सक्ती करण्यात आली आहे. मास्क शिवाय कोणाला ही मंदिर प्रवेश दिला जाणार नाही, स्वयंचलित सॅनिटायझर बूथ ची व्यवस्था केलेली आहे. दहा वर्षाखालील आणि ६५ वर्षावरील भाविकांना तसेच गरोदर स्त्रियांना मंदिर प्रवेश दिला जाणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून भाविकांनी स्वतः हुन शासकीय आदेशांचे पालन करून देव संस्थानला सहकार्य करावे असे आवाहन ही प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे यांनी केले आहे. तब्बल दीड वर्षांनी बाजारपेठ फुलली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून जेजुरी गडाकडे जाणारी मुख्य महाद्वार पथावरील बाजारपेठ आता पुन्हा फुलली आहे. उद्यापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होणार असल्याने व्यापाऱ्यांनी आपली भंडार खोबऱ्याची दुकाने, देवाचे टाक, प्रतीके, फोटो आदींची दुकाने उघडली आहेत. भाविकांना हवे ते उपलब्ध होण्यासाठी व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी लागणाऱ्या वस्तू भरून ठेवल्या आहेत.  मंदिर उघडल्याने व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. 

टॅग्स :JejuriजेजुरीPuneपुणेTempleमंदिरKhandoba Yatraखंडोबा यात्राGovernmentसरकार