यंदाही साधेपणानेच सरदार मुजुमदार गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST2021-09-06T04:14:33+5:302021-09-06T04:14:33+5:30

पुणे : पेशवेकालीन सरदार मुजुमदार गणेशोत्सव यंदा भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला अर्थात मंगळवार (दि.७) पासून सुरू होत आहे. कोरोनाच्या ...

Even this year, Sardar Mujumdar Ganeshotsav is simple | यंदाही साधेपणानेच सरदार मुजुमदार गणेशोत्सव

यंदाही साधेपणानेच सरदार मुजुमदार गणेशोत्सव

पुणे : पेशवेकालीन सरदार मुजुमदार गणेशोत्सव यंदा भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला अर्थात मंगळवार (दि.७) पासून सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही साधेपणानेच हा उत्सव साजरा होणार आहे.

कसबा पेठेतील सरदार मुजुमदार वाड्यात दरवर्षी, भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते ऋषिपंचमी असा पाच दिवस हा उत्सव असतो. तीनशेहून अधिक वर्षांपासूनची सरदार मुजुमदार गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे.

यंदा ७ ते ११ सप्टेंबर असा हा उत्सव साजरा केला जाणार आहे. मंगळवारी (दि.७) सकाळच्या मंगलप्रसंगी प्रमोद गायकवाड यांच्या सनई वादनाने उत्सवाला सुरुवात होईल. वल्लभेष गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत होईल. त्यांनतर ४.३० ते ६.३० आणि बुधवारी (दि.८) सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्रेयसबुवा बडवे यांचे कीर्तन होईल, तर गुरुवार (दि.९) सायंकाळी ५ ते ७ यावेळेत वासुदेवबुवा बुरसे यांचे कीर्तन होईल. शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मोरेश्वरबुवा जोशी चर्होलीकर यांचे कीर्तन होईल, तर ऋषिपंचमीला दुपारी ४ ते ५.३० आणि सायंकाळी ६ ते ७.३० वाजता मोरेश्वर जोशी चर्होलीकर यांच्याच लळिताच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होईल. उत्सवात तबल्यावर साथ योगेश देशपांडे यांची, तर पेटीवर साथ साहिल पुंडलिक यांची असेल.

उत्सवाबद्दल अनुपमा मुजुमदार म्हणाल्या, धार्मिक कार्यक्रमानेच यंदाचाही उत्सव साजरा होईल.

Web Title: Even this year, Sardar Mujumdar Ganeshotsav is simple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.