शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भलेही न दिसो सृष्टी, आता कान-नाक हीच त्याची दृष्टी; दहा वर्षे झाली तरी ‘गणेश’ वावरतो रुबाबात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 12:22 IST

‘तो’ पिंजऱ्यातील ओंडक्यावर, मचाणावर अतिशय लीलया वावरतो. कुठेही धडकत नाही. भलेही त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, तरीदेखील कान आणि नाक हेच त्याचे डोळे बनले आहेत.

श्रीकिशन काळे  पुणे : ‘तो’ पिंजऱ्यातील ओंडक्यावर, मचाणावर अतिशय लीलया वावरतो. कुठेही धडकत नाही. भलेही त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, तरीदेखील कान आणि नाक हेच त्याचे डोळे बनले आहेत.  त्याचे नाव ‘गणेश’ असून, त्याची दृष्टी जाऊन दहा वर्षे झाली. पण, तो अंध आहे, असे त्याला पाहून अजिबात वाटत नाही.  नाक आणि कान हे दोन्ही अवयव सजग ठेवून तो रुबाबात वावरतो. दृष्टी नसली तरी जगण्याची, शिकण्याची जिद्द असल्याने त्याचे आयुष्य सोपं झालं आहे. हा गणेश म्हणजे १३ वर्षांचा बिबट्या आहे. माणिकडोह बिबट निवारा केंद्रात येऊन नुकतीच त्याला १० वर्षे पूर्ण झाली. जुन्नरचे उपवनसंरक्षक जयराम गौडा आणि केंद्रातील वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर यांनी याविषयी माहिती दिली. 

‘गणेश’ हा नाशिक जिल्ह्यातील एका गावात जखमी अवस्थेत रेस्क्यू केलेला बिबट्या आहे. २०११ मध्ये एका गावात चुकून तो आला होता. नागरिकांनी लाठी, बांबूने त्याला मारले आणि तो त्यात गंभीर जखमी झाला. त्याच्या दोन्ही डोळ्यांना जबर मार बसला होता. काही दिवसांनी त्याच्या एका डोळ्यामध्ये इन्फेक्शन होऊन तो निकामी झाल्याने शस्त्रक्रिया करून काढावा लागला. 

दोघांची दोस्ती मस्त...या गणेशचा एक दोस्त असून, त्याचे नाव विठ्ठल आहे. दोघेही एका पिंजऱ्यात असून, त्यांच्यात चांगली गट्टी आहे.  विठ्ठल हादेखील जखमी अवस्थेत केंद्रात आणला होता. तो एका ट्रॅपमध्ये अडकल्याने त्याच्या मागील एका पायाचा पंजा कापावा लागला. कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात सोडता येत नाही, म्हणून माणिकडोह बिबट निवारा केंद्रात  वन विभाग आणि वाइल्डलाइफ एसओएसचे कर्मचारी बिबट्यांचे संगोपन करीत आहेत. सध्या केंद्रात एकूण ३४ बिबटे आहेत.

जुन्नर परिसरातील मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. हा संघर्ष कमी झालेला असून, त्यासाठी नागरिकांचेही सहकार्य लाभले आहे. डॉ. जयराम गौडा, उपवनसंरक्षक, जुन्नर वन विभाग 

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्या