शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जन्मशताब्दी वर्ष संपत आले तरी गदिमांचे स्मारक कागदावरच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 13:19 IST

एखाद्या भिकाऱ्यासारखे ‘स्मारक करा, स्मारक करा,’ किती वेळा म्हणायचे?....

ठळक मुद्दे४२ वर्षे पुण्यात गदिमांचे स्मारक रखडलेलेखासदार गिरीश बापट यांनी स्मारकासाठी सुरूवात म्हणून २५ लाख भाषणातच केले होते मंजूर

पुणे : ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला १ ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रारंभ झाला. या वर्षभराच्या कालावधीत पुण्यात गदिमांचे स्मारक व्हावे, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. त्यासाठी कुटुंबाने महापालिकेशी अनेकदा पाठपुरावा केला. अखेर महापालिकेने पावले उचलत कोथरूड येथील  ‘महात्मा सोसायटी’ जवळील ‘सर्व्हे नं. ६९-७०’ ही जागा स्मारकासाठी निश्चित केली. मात्र, त्यानंतर कोणतीच हालचाल झालेली नाही. गदिमा शताब्दी वर्ष संपायला केवळ काही दिवस बाकी असताना गदिमांचे स्मारक अजून कागदातून बाहेर आलेले नाही. ४२ वर्षे पुण्यात गदिमांचे स्मारक रखडलेले आहे. यासंदर्भात माहिती देताना गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर म्हणाले, गेली दोन वर्षे (२०१८-१९) मी स्वत: पाठपुरावा करून महापौर मुक्ता टिळक, नगरसेविका माधुरीताई सहस्रबुद्धे यांच्या सोबत पुण्यात फिरून अनेक जागा पाहिल्या व शेवटी कोथरूड येथील महात्मा सोसायटीजवळील सर्व्हे नं. ६९-७०ही जागा स्मारकासाठी निश्चित केली, पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची यासाठी मंजुरीही घेतली. फेब्रुवारी २०१९ ला स्मार्ट सिटी अंतर्गत ते मंजूरही करून घेतले. शताब्दीला सुरूवात होताना कोथरूड येथे झालेल्या समारंभात  महापौरांनी याची जाहीर घोषणा केली. त्या वेळी आताचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी स्मारकासाठी सुरूवात म्हणून २५ लाख भाषणातच मंजूर केले होते, पण पुढे काहीच घडले नाही. महानगरपालिकेच्या गचाळ कारभारामुळे शताब्दी संपत आली तरीही स्मारक ‘जैसे थे’ अवस्थेतच आहे.कोथरूड येथील महात्मा सोसायटी जवळील सर्व्हे नं. ६९-७० हा जवळ जवळ १0 एकराचा भूखंड ‘एक्झिबिशन सेंटर’ म्हणून राखीव आहे. यातील काही जागा गदिमा स्मारकासाठी मंजूर करण्यात आली आहे. पण पूर्ण जागेत स्मारक कुठे व किती जागेत होईल, याचा आराखडा महापालिकेकडून अजून तयार करण्यात आलेला नाही. गदिमा  स्मारक कसे असावे, याचा आराखडा  ही महानगरपालिकेला देण्यात आलेला आहे. शताब्दी वर्षात स्मारकाचे भूमिपूजन होऊन त्याच्या प्रत्यक्ष कामास सुरवात होईल, अशी अपेक्षा होती. पण तसे झालेले नाही. महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे १ आॅक्टोबर २०१९ रोजी शताब्दी संपताना गदिमांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागावा इतकीच मराठी रसिकांची व माडगूळकर कुटुंबीयांची माफक अपेक्षा आहे...........पुणे महापालिकेकडून दिरंगाई...एकीकडे महाराष्ट्र शासन गदिमा-पुल-फडके शताब्दी साजरी करत असताना पुणे महानगरपालिका मात्र गदिमा स्मारकाच्या बाबतीत बेफिकिरी दाखवीत आहे. पुणे या गदिमांच्या कर्मभूमीतून त्यांचे स्मारक सतत रखडावे या सारखा दैवदुर्विलास दुसरा नाही. गदिमांवर गेली ४२ वर्षे होत असलेला अन्याय आता महानगरपालिकेने दूर करावा व शताब्दी संपायच्या आत आराखडा करून भूमिपूजन तरी व्हावे हीच गदिमांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सुमित्र माडगूळ यांनी सांगितले.............

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMukta Tilakमुक्ता टिळकgirish bapatगिरीष बापट