शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रविवारीही कामावर या...! कर्जमाफीसाठी सहकार विभागाच्या सुट्या पुन्हा एकदा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 12:48 IST

सहकार विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक सुट्या पुन्हा एकदा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.

ठळक मुद्देसार्वजनिक सुट्या पुन्हा एकदा रद्द करण्यात आल्याने अधिकारी व कर्मचारी अस्वस्थशुक्रवारी ईद-ए-मिलादची जाहीर झालेली शासकीय सुटीही रद्द

पुणे : शेतकरी कर्जमाफी योजना यशस्वी करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असलेल्या सहकार विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक सुट्या पुन्हा एकदा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होऊन महिना उलटून गेला; मात्र अद्यापही दुसरी यादी जाहीर झालेली नाही. पहिल्या टप्प्यातील यादीमध्येही मोठ्या प्रमाणावर त्रुटी राहिल्याने सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकलेले नाहीत. आयटी विभागाच्या चुकांमुळे कर्जमाफीला वेळ लागत असल्याचे चित्र आहे. पहिल्या यादीतील त्रुटी दूर करून ही निर्दोष यादी शासनाला पाठविण्यात आली आहे. दुसºया हिरव्या यादीचे काम वेगाने सुरू आहे. त्यामध्ये उद्भवणाऱ्या अडचणी दूर करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांकडून कर्जमाफीला लागत असलेल्या विलंबामुळे टीका होऊ लागली आहे. त्यामुळे सहकार विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाची धावपळ सुरू आहे. या याद्यांच्या कामासाठी हातात वेळ कमी राहिला असून अधिवेशनापूर्वी दुसरी यादी जाहीर करून त्यांना कर्जमाफी देण्याचा प्रयत्न शासन स्तरावर सुरू आहे. त्यामुळे सहकार विभागावर कामाचा प्रचंड त्राण आहे. सध्या सहकार विभागातील उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी कर्जमाफीच्या कामामध्ये गुंतले आहेत.चार महिन्यांपासून या विभागातील अधिकारी हे कर्जमाफीच्या कामाला जुंपलेले आहेत. यापूर्वीही त्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या होत्या. सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी सुट्या रद्द करण्याचा आदेश दिल्याने आणखीनच अस्वस्थता वाढली आहे. शुक्रवारी ईद-ए-मिलादची जाहीर झालेली शासकीय सुटी रद्द करण्यात आली आहे.रविवारीही कर्जमाफी योजनेचे काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश झाडे यांनी दिले आहेत. त्यामुळे जोडून आलेल्या सुट्या उपभोगता येणार नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे