शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल युगातही अर्धे वीजग्राहक रांगेतच; 'हे' आहेत ऑनलाईन वीजबिल भरण्याचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 15:02 IST

ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठीचे पर्याय...

बारामती (पुणे) : डिजीटल इंडियात व महाराष्ट्रात तब्बल ४९ टक्के वीजग्राहक आजही पारंपरिक पद्धतीने स्वत:चा वेळ व पैसा वाया घालत रांगेत उभे राहून वीजबिल भरत असल्याचे वास्तव आहे. बारामती परिमंडलात शेतीचे ग्राहक वगळता २० लाख ३४ हजार ग्राहक आहेत. ज्यापैकी १२ लाख ८४ हजार ग्राहकांनी जून महिन्यात वीजबिल भरले. त्यातील ६ लाख ५६ हजार २४४ (५१ टक्के) ग्राहकांनी विविध ऑनलाईन पर्यायाद्वारे घरबसल्या वीजबिल भरले व ऑनलाईन सूट व पेट्रोलचे पैसे वाचविले. तर ६ लाख २९ हजार ६५५ ग्राहकांनी उन्हातान्हात घराबाहेर पडून, स्वत:चा वेळ व पेट्रोलचा खर्च करुन वीजबिल भरले. त्यातील कुणी वीजबिल भरण्यासाठी स्वत:च्या कामावर उशिरा पोहोचते तर कुणाला अर्धा दिवसाची रजा टाकावी लागते. यातून दुहेरी नुकसानच होते.

आज सर्व शहरात, गावांत 4G नेटवर्क पोहोचले आहे. स्मार्टफोन सुद्धा खिशात आहेत. मात्र त्याचा वापर फक्त सेल्फी पुरता न करता दैनंदिन कामे सुकर करण्यासाठी केला तर महावितरणचे वीजबिल वेळेआधी व घरबसल्या भरणे सहज शक्य आहे. 

ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठीचे पर्याय :-

1. संकेतस्थळ : www.mahadiscom.in नावाने महावितरणचे संकेतस्थळ असून, या संकेतस्थळावर वीजबिल भरण्याची जलद सुविधा उजव्या कोपऱ्यात दिली आहे. १२ अंकी वीजग्राहक क्रमांक टाकून वीजबिल सहज भरता येते. गुगलवर view & pay bill सर्च केल्यास पैसे भरण्यासाठी wss सुविधा वापरता येते. सर्व प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांच्या नेटबँकिंग, क्रेडिट व डेबिट कार्डचा वापर वीजबिल भरण्यासाठी करता येतो.

2. मोबाईल ॲप : प्ले स्टोअर व ॲप स्टोअरवर महावितरण मोबाईल ॲप उपलब्ध आहे. हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन आपण एकापेक्षा जास्त वीजजोडण्या जगाच्या पाठीवर कोठूनही हाताळू शकतो. यात वीजबिल पाहण्याची, भरण्याची, वीजपुरवठा व वीजबिलासंबंधी तक्रारी नोंदविण्याची सोय आहे. नावात बदल, वीजभार कमी जास्त करण्याची मागणी सुद्धा यातून नोंदवता येते. लाखो ग्राहकांनी हे ॲप लाऊनलोड केले आहे.

3. UPI Gateways : BHIM, Gpay, PhonePay, Paytm यांसारखे UPI ॲप आपल्या बँक खात्याशी संलग्न करुन वीजबिल सुलभरित्या भरता येते. एकदा यावर वीजबिल भरले तर पुढचे वीजबिल तयार होताच हे ॲप आपल्याला ते भरण्याची सुचना देतात. 

4. QR कोड : गेल्या काही वर्षांपासून वीजबिलावर क्यूआर कोड (Quick Response code)  छापला जात आहे. बिलावरील क्यूआर कोडला युपीआय ॲपद्वारा स्कॅन केले की वीजबिल भरता येते. येथे वीजबिलाची रक्कम टाकण्याची आवश्यकता नाही. 

ऑनलाईन वीजबिल भरण्याचे फायदे :- ऑनलाईन वीजबिल भरण्याचे अनेक फायदे आहेत. इथे वेळेसोबत इंधनाची बचत होते. वरील पर्यायाद्वारे एका क्लिकवर बील भरता येते. वीजबिल तयार झाल्यापासून पहिल्या सात दिवसांत वीजबिल भरले तर जवळपास १ टक्का सूट मिळते. याशिवाय ऑनलाईन भरल्यामुळे अतिरिक्त पाव टक्का असे मिळून सव्वा टक्क्यांची बचत करता येते.

महावितरण मोबाईल ॲप लिंक-https://play.google.com/store/apps/details?id=com.msedcl.app

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजonlineऑनलाइनdigitalडिजिटल