शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
2
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
3
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
4
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
5
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
6
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
7
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
8
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
9
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
10
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
11
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
12
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
13
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
14
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
15
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
16
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
17
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
18
अत्यंत प्रतिकूल काळात सनातन वैदिक हिंदू धर्माचे रक्षण करणारे आद्य शंकराचार्य यांची जयंती; वाचा कार्य!
19
Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार!
20
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

पती काम करत नसला तरी मुलगा व पत्नीची जबाबदारी झटकू शकत नाही; १० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश

By नम्रता फडणीस | Published: March 13, 2024 4:25 PM

लग्नानंतर मुलीच्या वडिलांनी दिलेले घर स्वतःच्या नावावर करण्यासाठी पती आणि त्याचे कुटुंबीय त्रास देऊ लागले होते

पुणे: पत्नी आयटी कंपनीत कामाला आहे. वडिलांनी लग्नाच्या वेळी घर तिच्याच नावावर केल्याने पतीसह त्याचे कुटुंबीय तिच्याच घरात राहते. पती कोणतेच काम करीत नाही. मुलगा आणि स्वतःचा सर्व खर्च तीच करते. पती आणि त्याच्या कुटुंबियांकडून होणा-या मानसिक व शारीरिक छळामुळे पत्नीने कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत न्यायालयात अर्ज दाखल करीत पोटगीची मागणी केली. त्यावर पती काम करीत नसला तरी तो मुलगा आणि पत्नीची जबाबदारी झटकू शकत नाही असा निष्कर्ष नोंदवित पत्नी व मुलाच्या देखभालीसाठी दरमहा १० हजार रुपये पोटगी म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने पतीला दिला. पिंपरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.एम. गिरी यांनी हा निकाल दिला.      राहुल आणि लीना ( नावे बदललेली आहेत) या दोघांचे २०१८ मध्ये मॅरेज झाले. लीना आयटी कंपनीत कामाला आहे. लग्न झाल्यापासूनच नोकरी न करता पती शेअर ट्रेडिंग चा बिझनेस करतो असा पत्नीचा समज आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांना मुलगा झाला. पतीने पत्नी व मुलासाठी कोणतेही आर्थिक योगदान दिलेले नाही तसेच कोणतीही आर्थिक सोय केलेली नाही .लग्नाच्या वेळी वडिलांनी मुलीला घर दिले. पण ते घर मुलीच्या नावावर केले. ते घर आपल्या नावावर करून देण्यासाठी पती आणि त्याचे कुटुंब लीनाला त्रास देऊ लागले. त्यामुळे पत्नीने अँड. प्रसाद विराज निकम यांच्या मार्फत कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली अर्ज दाखल केला होता. पती हा पत्नी व मुलाला सांभाळायची जवाबदारी झटकू शकत नाही. पत्नी चा सांभाळ ना करणं, तिचा अपमान करणं, तिला जेवण न देणं ह्या सर्व गोष्टी कौटुंबिक हिंसाचाराच्या अखत्यारीत येतात, असा युक्तिवाद अँड. निकम यांनी केला युक्तिवाद मान्य करत पत्नीचा पोटगी अर्ज मंजूर करण्यात आला. या प्रकरणात त्यांना अँड. मन्सूर तांबोळी, अँड तन्मय देव व अँड शुभम बोबडे यांनी सहकार्य केले.

लग्नानंतर पतीने पत्नी व मुलाचा सांभाळ करायचा असतो. असे असतानाही इकडे पती व मुलाचा सांभाळ पत्नीच करतीये. पती हा पत्नीला त्रास देण्याव्यतिरिक्त काही काम करत नाही. न्यायालयाने पतीला त्याच्या जबाबदारीची योग्य जाणीव करून देत पत्नीचा अर्ज मंजूर केला आहे - अँड. प्रसाद विराज निकम, पत्नीचे वकील

टॅग्स :Puneपुणेhusband and wifeपती- जोडीदारCourtन्यायालयSocialसामाजिकMONEYपैसा