शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

'वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल, पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करावेच लागेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 22:30 IST

येत्या वर्ष दोन वर्षात एअरलाइन्स ११०० मोठी विमान घेणार आहेत. ती वेगवेगळ्या विमानतळावर थांबणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : थोडा वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल ,परंतु पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करावच लागेल.यामध्ये लॅडींग आणि टेकआॅफ साठी एक धावपट्टी करण्यासाठी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा प्रयत्न आहे.उद्याची ५० वर्ष लक्षात घेवून हा निर्णय घ्यावा लागणार आहे,अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

बारामती येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार यांनी विमानांची वाढती संख्या आणि अपुरे विमानतळांसाठी अपुरी जागा याबाबत चिंता व्यक्त केली.यावेळी पवार म्हणाले,पुण्याचे विमानतळ संरक्षण विभागाचे आहे. दुसरे पुरंधरचे विमानतळाच्या जागेचा प्रश्न आहे.मात्र,वाइटपणा घेवुन विमानतळाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सुतोवाच पवार यांनी केले.

यावेळी पवार यांनी बारामतीच्या विमानतळाबाबत देखील  महत्वाची माहिती दिली.ते म्हणाले, बारामतीमध्ये नाइट लॅंडींग करायचे आहे.आपल्याकडेबारामतीत एका बाजुला रेल्वे आहे.दुसर्या बाजुला गोजुबावी तळ खड्ड्यात आहे.त्यामुळे बारामतीत  मोठी विमाने उतरविण्यास अडचण आहे. मागील काळात सरकारने काही विमानतळ ठेकेदारी पध्दतीवर दिलेली  आहेत.यामध्ये बारामती,धाराशीव,नांदेड,लातुर सह पाच विमानतळांचा समावेश आहे.

बारामतीचे  विमानतळ परत ताब्यात घेण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.आपल्याकडे मोठे विमान उतरण्यास अडचण आहे. बारामतीला मोठी विमान उतरविण्याचा माझा प्रयत्न होता. कारण मुंबइ विमानतळावर विमानांची प्रचंड गर्दी आहे. एवढ्या उद्योगपतींची खासगी विमान आहेत. येत्या वर्ष दोन वर्षात एअरलाइन्स ११०० मोठी विमान घेणार आहेत. ती वेगवेगळ्या विमानतळावर थांबणार आहेत. खासगी विमान मुंबईत सोडुन इतरत्र थांबत असल्याचे पवार यांनी निदर्शनास आणले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBaramatiबारामती