गणेशोत्सव काळातही दिवसाआडच पाणी

By Admin | Updated: September 16, 2015 12:14 IST2015-09-15T04:43:27+5:302015-09-16T12:14:12+5:30

गणेशोत्सव काळात प्रतिष्ठापना तसेच विसर्जन दिनी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्यास अधिकाऱ्यांनी विरोध केला. महापौरांनी त्यांना याबाबतचा लेखी अहवाल सादर

Even during the Ganeshotsav period, the water should be repeated | गणेशोत्सव काळातही दिवसाआडच पाणी

गणेशोत्सव काळातही दिवसाआडच पाणी

पुणे : गणेशोत्सव काळात प्रतिष्ठापना तसेच विसर्जन दिनी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्यास अधिकाऱ्यांनी विरोध केला. महापौरांनी त्यांना याबाबतचा लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, १६ सप्टेंबरला या विषयावर पुन्हा बैठक होणार आहे.
ऐन सणासुदीच्या काळात शहरात पाणीकपात सुरू आहे. पावसाअभावी धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने सध्या शहरात एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. किमान गणेशोत्सवात प्रतिष्ठापना व विसर्जन दिनी तसेच हरितालिका पूजनाच्या दिवशी पाणी सोडावे, अशी मागणी होती. त्याबाबत विचार करण्यासाठी तसेच एक दिवसाआड पाणीपुरवठ्यासंदर्भातील तक्रारींची विचारणा करण्यासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी आज त्यांच्या कार्यालयात बैठक बोलावली होती. उपमहापौर आबा बागुल तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी व अन्य अभियंते, अधिकारी उपस्थित होते.
अशा प्रकारे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्यात काही तांत्रिक अडचणी असल्याचे अधिकाऱ्यांनी महापौरांना सांगितले. शहराच्या काही भागात पाणी सोडताना दुसऱ्या दिवशीच्या नियोजनासाठी जलवाहिन्या पाण्याने पूर्ण भरून घ्यावा लागतात. असे केले नाही, तर पुढच्या परिसराला पाणी मिळणार नाही. पुरवठ्याचे सध्याचे वेळापत्रक बदलले, तर या नियोजन कोलमडेल. काही भागाला पाणी मिळणार नाही; त्यामुळे गणेशोत्सवासाठी सध्याच्या वेळापत्रकात बदल करणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तांत्रिक अडचणींचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले. १६ सप्टेंबरला यावर पुन्हा बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्याचा निर्णय महापौरांनी जाहीर केला. (प्रतिनिधी)

Web Title: Even during the Ganeshotsav period, the water should be repeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.