शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
2
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
3
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
4
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
5
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
6
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
7
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
8
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
9
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
10
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
12
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
13
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
14
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
15
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
16
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
17
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
18
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
19
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!

आयुष्याच्या ८५ व्या वर्षी संघर्षाला सोबती घेऊन 'आजीबाईं'ना पोटापाण्यासाठी करावी लागतेय कसरत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 20:41 IST

सोशल मीडियावर तुफान हिट आणि व्हायरल झालेला या आजींबाईंच्या व्हिडिओमुळे त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष नुकताच आला समोर

ठळक मुद्देतरुणपणी सीता और गीता शेरनी या हिंदी चित्रपटात केले काम

पुणे : आयुष्यं म्हटलं की संघर्षही न चुकता आलाच. या संघर्षाला मग वयाचे बंधन तरी कोठे आले हो. ज्या वयात कुटुंबातील छोट्या छोट्या नातवंडांना अंगा खांद्यावर खेळवत तसेच देवाजीच्या नामस्मरणात घरात वेळ घालवायचा असतो तिथे एक आजीबाई दहा माणसांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या हिमतीवर पार पाडत आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी शरीर साथ देत नसताना देखील त्यावर मात करत तरुणांना लाजवेल अशी थरारक 'कामगिरी'करत आहेत. सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला व्हिडिओमुळे या आजींचे कष्ट व जगण्यासाठीचा संघर्ष नुकताच समोर आला आहे. या आज्जीबाईंचे नाव आहे शांताबाई पवार.. 

पुण्यातील हडपसर परिसरात या ८५ वर्षाच्या आजीबाई आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांनी तरुणपणी सीता और गीता शेरनी या हिंदी चित्रपटात काम केले. मात्र, आता ऊन , वारा, पाऊस एव्हाना कोरोनाकाळात देखील दोन वेळच्या अन्न पाण्यासाठी रस्त्यावर उतरुन मोठी कसरत करावी लागत आहे.पण सोशल मीडियावर त्यांचा एक काठी फिरवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.हा व्हिडिओ पाहून अभिनेता रितेश देशमुख यांनीही त्यांचा हा काठी फिरवताना चा व्हिडिओ शेअर करत 'वॉरिअर आजी' असे त्याला कॅप्शन दिले. 

या आजींचे कुटुंब मोठे आहे. घरची परिस्थिती हलाखीची आणि बिकट आहे. त्यामुळे नातवांची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये यासाठी शरीराची साथ मिळत नसतानासुध्दा कुटुंबासाठी त्या मोठ्या हिंमतीने नव्या जोशात लाठीकाठीचे प्रात्यक्षिके करुन दाखवत आहेत. त्यांची वाºयाच्या वेगाने गरगरा फिरणारी काठी पाहून सर्वच जण अवाक् होत आहेत. याअगोदर आजीबाइर् त्या रस्त्यावर डोंबा?्याचा खेळ सादर करत असत. मात्र, तीन महिन्यांपूर्वी एका खेळादरम्यान त्या खाली पडल्या आणि त्यांच्या हाताला जखम झाली. तेव्हापासून हा डोंबा?्याचा खेळ बंद झाला. परंतु, त्यानंतर सुध्दा शांताबाई थांबल्या नाही. पुन्हा एकदा नव्या उमेदीने रस्त्यावर उतरत रात्री एकटीने प्रात्यक्षिक दाखवण्यास सुरुवात केली. त्यातून मिळालेल्या पैशातून सध्या त्यांच्या कुटुंबियांची उपजीविका चालते आहे. सध्या त्यांच्या घरात सात नातवंडे आहेत. घर पत्र्याचं असूनही मिळेल त्या पैशातून त्या नातवंडांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतात. 

याबाबत शांताबाई पवार या आजींनी लोकमतशी संवाद साधताना आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली. त्या म्हणाल्या, वयाच्या आठव्या वर्षीपासून वडिलांनी काठी चालविण्याचे प्रशिक्षण दिले.त्यानंतर तरुणपणी सीता और गीता शेरनी या हिंदी चित्रपटात धमेंद्र यांच्यावर चित्रित एका दृश्यात काम करण्याचा योग आला.

अगोदर लोकांपर्यंत हा संघर्ष यावा यासाठी फार प्रयत्न केले.परंतु, त्यावेळी अपेक्षित प्र्रतिसाद मिळाला नाही. आपली दखल सरकार किंवा नेतेमंडळी घेत नाही म्हणून खूप वाईट वाटत असे पण यावेळी सगळी कसर भरुन निघाली.लोकांनी माझ्या कष्टाला मोठं करत माझी दखल देखील घेतली.

..........

पत्ता - सर्व्हे नं - 106, गोसावी वस्ती, बौद्धविहार जवळ वैदुवाडी, हडपसरपुणे.आजींचा संपर्क - 9373611504 / 9552030396

Account details : 

शांता बाळू पवार बँक ऑफ महाराष्ट्रअकाउंट नंबर :  60163754342IFSC code : MAHB0000001ब्रँच : पुणे हडपसर

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरWomenमहिलाSocial Viralसोशल व्हायरल