युरो स्कूलने विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढले
By Admin | Updated: April 5, 2016 01:05 IST2016-04-05T01:05:39+5:302016-04-05T01:05:39+5:30
मनमानी पद्धतीने वाढविलेले शुल्क न भरल्याने वाकड येथील युरो स्कूलने सुमारे १५ विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले असून, पालकांच्या हातात विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले दिले

युरो स्कूलने विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढले
पुणे: मनमानी पद्धतीने वाढविलेले शुल्क न भरल्याने वाकड येथील युरो स्कूलने सुमारे १५ विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले असून, पालकांच्या हातात विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले दिले आहेत. त्याचप्रमाणे वेळेत शुल्क न भरल्याने सोमवारी
एका विद्यार्थ्यास शाळेने तासभर
डांबून ठेवले, त्यामुळे युरो स्कूलवर
गुन्हा दाख करावा, या मागणीसाठी पॅरेन्ट्स आॅफ प्रायव्हेट स्कूल्स
आॅफ महाराष्ट्रा (पॉपसॉम) या संघटनेच्या माध्यमातून पालकांनी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले.
नफेखोरी करण्याच्या उद्देशाने पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरातील काही शाळांकडून बेकायदेशीर शुल्कवाढ केली जात आहे. मात्र, दरवर्षी शाळांकडून होणाऱ्या मनमानी शुल्कवाढीस पालक विरोध करत आहेत. तसेच शाळांनी नियमानुसार शुल्कवाढ केल्यास ती भरण्यास आम्ही तयार आहोत अशी भूमिका पालकांनी घेतली आहे. मात्र, युरो स्कूल प्रशासनाने शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले. त्यामुळे पालकांनी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन करून शाळेवर कारवाईची मागणी केली.
शिक्षण अयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर पुण्यात नसल्याने पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी पालकांशी संवाद साधला. पुण्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यांतील पालकांनी शाळांकडून विद्यार्थ्यांना बाहेर काढले जात असल्याच्या तक्रीरींचा पाढा वाचला.
तसेच संबंधित शाळेवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अनुभा सहाय, अनिल साठे, अजय पंडित, प्राजक्ता पेठकर यांनी
केली. शाळेतून बाहेर काढल्याने आयुक्त कार्यालयाबाहेर बसून विद्यार्थी गणित सोडवत बसले होते. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे आयुक्तांच्या दारात बसण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.