भोंदूंनी आणखी एकाला फसवले

By Admin | Updated: January 31, 2017 03:50 IST2017-01-31T03:50:57+5:302017-01-31T03:50:57+5:30

पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून शिक्रापूर येथील तरुणाची ४ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केलेल्या तीन भोंदू बाबांनी पुण्यातील एकाला १५ लाख रुपयांना फसवल्याचे

The eunuch deceived another man | भोंदूंनी आणखी एकाला फसवले

भोंदूंनी आणखी एकाला फसवले

शिक्रापूर : पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून शिक्रापूर येथील तरुणाची ४ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केलेल्या तीन भोंदू बाबांनी पुण्यातील एकाला १५ लाख रुपयांना फसवल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या तिन्ही भोंदू बाबांची येरवडा कारागृहात रवानगी केली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी : मंदार अरविंद वैद्य (रा. विठ्ठलनगर, सिंहगड रोड, पुणे-५१) यांची १५ लाख रुपयांची फसवणूक झाली. याबाबत वृत्तपत्रात शिक्रापूर येथील युवकाची फसवणूक झाल्याची बातमी वाचून मंदार वैद्य यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिली. सागरनाथ मिठानाथ परमार (वय ६५), चंदूनाथा सागरनाथ परमार (वय २३), पटेलनाथ संजूनाथ चौहान (वय ६७, तिघे रा. सतलासा, ता. सतलासा, राज्य गुजरात, सध्या रा. सासवड, ता. पुरंदर) यांना शिक्रापूर येथील फसवणूक केलेल्या गुन्ह्यात शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती.
त्यांच्याकडे अधिक तपास केला असता वरील गुन्हा उघडकीस आला. दरम्यान, मंदार वैद्य यांना पुण्यात फसवले असल्याने शिक्रापूर पोलिसांनी हा गुन्हा पुण्यात वर्ग केला आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे व पथकाने आरोपींना सासवड येथून अटक केली होती. (वार्ताहर)

Web Title: The eunuch deceived another man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.