रंगभूमीवरून नैतिकतेचे धडे
By Admin | Updated: July 19, 2014 23:06 IST2014-07-19T23:06:56+5:302014-07-19T23:06:56+5:30
‘‘संगीत रंगभूमी हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक भान ठेवत एक शिकवण देणारे माध्यम आहे.

रंगभूमीवरून नैतिकतेचे धडे
पुणो : ‘‘संगीत रंगभूमी हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक भान ठेवत एक शिकवण देणारे माध्यम आहे. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतिच्या प्रभावात भरकटलेल्या तरुण वर्गाला नैतिक व सामाजिक जबाबदा:यांचे भान देणारे माध्यम म्हणून याचा उपयोग व्हायला हवा,’’ अशी अपेक्षा माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केली.
बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या वतीने शनिवारी विविध पुरस्कारांचे वितरण पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार गायक आनंद प्रभुदेसाई यांना प्रदान करण्यात आला. अण्णासाहेब किलरेस्कर पुरस्कार लेखक लताफ हुसेन काझी यांना तर सावळो केणी पुरस्कार तबलावादक नाना मुळे यांना प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. तसेच काकासाहेब खाडिलकर पुरस्कार गायिका राजश्री ओक यांना, गोविंद देवल पुरस्कार नाटय़ दिग्दर्शक चंद्रकांत ग. धामणीकर, सेवागौरव पुरस्कार ज्येष्ठ ऑर्गन वादक पं. जयराम पोतदार यांना प्रदान करण्यात आला. 5 हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. अजित भालेराव व सुनिता गुणो यांना द. कृ. लेले पुरस्कार देण्यात आला.
शिक्षणतज्ज्ञ देविसिंग शेखावत, बांधकाम व्यावसायिक एन. जी. कुलकर्णी, विठ्ठल संकपाळ, मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी उपस्थित होते.
मंडळाच्या उपाध्यक्षा अनुराधा राजहंस यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)