शाश्वत, देवचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST2021-03-09T04:12:19+5:302021-03-09T04:12:19+5:30
जी. ए. रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत मुलांच्या गटात बिगरमानांकित महाराष्ट्राच्या शाश्वत ...

शाश्वत, देवचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
जी. ए. रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत मुलांच्या गटात बिगरमानांकित महाराष्ट्राच्या शाश्वत मिश्रा याने आपला राज्य सहकारी आठव्या मानांकित शौर्य घोडकेचा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. गुजरातच्या देव पटेल याने पाचव्या मानांकित प्रतिक शेरॉनचा पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली.
चुरशीच्या लढतीत आयुश पुजारीने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या क्रिशांक जोशीचा टायब्रेकमध्ये तीन सेटमध्ये पराभव करून दुसरी फेरी गाठली. महाराष्ट्राच्या वीर महाजन याने ओरिसाच्या अंशुमन आचार्यचे आव्हान सहज मोडीत काढले. मुलींच्या गटात क्वालिफायर महाराष्ट्राच्या वृंदिका राजपूत हिने गुजरातच्या त्रिशा ठक्करला टायब्रेकमध्ये पराभूत केले. महाराष्ट्राच्या मेहक कपूर हिने मेहा पाटीलला नमविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली(मुख्य ड्रॉ)फेरी मुलेरुद्र बाथम, मध्य प्रदेश (1) वि.वि. रणवीर पन्नू, कर्नाटक 6-2, 6-1;
आयुश पुजारी, महाराष्ट्र वि.वि. क्रिशांक जोशी महाराष्ट्र 7-6(2), (3)6-7, 6-0;
वीर महाजन, महाराष्ट्र वि.वि.अंशुमन आचार्य, ओरिसा 6-1, 6-1;
अयान शेट्टी, महाराष्ट्र वि.वि. श्लोक चौहान, महाराष्ट्र 7-5, 6-3;
हित कांदोरिया, गुजरात वि.वि. सिद्धार्थ जिबू, तेलंगणा 6-1, 6-3;
शाश्वत मिश्रा, महाराष्ट्र वि.वि. शौर्य घोडके, महाराष्ट्र, (8)6-1, 6-4;
ओजस मेहलावट, दिल्ली, (3) वि.वि.अद्वित तिवारी, हरियाणा 6-0, 6-1;
देव पटेल, गुजरात वि.वि. प्रतिक शेरॉन, हरियाणा (5) 6-2, 6-1;
शशांक कर्णाती, तेलंगणा (6) वि.वि.शार्दूल खवळे, महाराष्ट्र 7-5, 7-5;ओम वर्मा, महाराष्ट्र वि.वि. वरद पोळ, महाराष्ट्र 6-1, 6-1;
मुली:
वृंदिका राजपूत, महाराष्ट्र वि.वि. त्रिशा ठक्कर, गुजरात 7-6(1), 6-4;
सृष्टी किरण, कर्नाटक वि.वि. नैशा गर्ग, दिल्ली 6-1, 6-0;
मेहक कपूर, महाराष्ट्र वि.वि. मेहा पाटील, महाराष्ट्र 6-2, 6-1;
आनंदिता उपाध्याय, हरियाणा वि.वि. तेजस्वी मानेनी, तेलंगणा 6-0, 6-0.