शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागरी बँकांसाठी सर्वोच्च संघटनेची स्थापना, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची माहिती

By नितीन चौधरी | Updated: February 22, 2025 17:55 IST

नागरी सहकारी बँकांसाठी सर्वोच्च संघटनेची स्थापना करण्यात येणार

पुणे : देशभरातील नागरी सहकारी बँकांसाठी केंद्रीय निबंधकांचे कार्यालय वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू करण्यात येणार असून देशातील पहिले स्तानिक कार्यालय पुण्यात सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी दिली. नागरी सहकारी बँकांसाठी सर्वोच्च संघटनेची स्थापना करण्यात येणार असून त्यासाठी ३०० कोटी रुपयांचे भागभांडवल जमा करण्यात आले आहे. यातून या बँकांना अधिक सक्षम करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.शहा शनिवारी (दि. २२) पुणे दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, “देशात एकूण १ हजार ४६५ नागरी सहकारी बँका असून त्यातील एकट्या महाराष्ट्रात ४६० बँका आहेत तर ५९ शेड्युल्ड बँक आहेत. या बँकांसाठी केंद्र स्तरावरील निबंधक कार्यालय आता स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून देशातील पहिले केंद्रीय निबंधक कार्यालय पुण्यात सुरू होणार आहे.

नागरी सहकारी बँकांसाठी एका सर्वोच्च संघटनेची स्थापना करण्यात येत असून यासाठी ३०० कोटी रुपयांचे भागभांडवल तयार करण्यात आले आहे. या संघटनेमुळे नागरिक सहकारी बँकांचे सक्षमी करण करण्यात येणार आहे. तांत्रिक बाबींमध्ये देखील संघटना मदत करणार आहे.”देशातील नागरी, राज्य तसेच जिल्हा बँकांच्या क्लिअरिंगसाठी एक स्वतंत्र व्यवस्था तयार करण्यात येत असून येत्या दोन वर्षांत ती पूर्ण केली जाणार आहे. नागरी सहकारी बँकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी सहकार विभागाने आतापर्यंत अनेक उपाय योजले आहेत. या बँकांना आधार प्रमाणित पेमेंट व्यवस्था देखील तयार करण्यात आली असून सोने कर्ज, गृह कर्ज यासाठीची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. व्यावसायिक बँकांप्रमाणेच नागरी सहकारी बँकांतही कर्ज निपटारा योजना लागू करण्यात आली आहे.राष्ट्रीय बँका छोट्या वित्त संस्था, अबँकिंग वित्त संस्था यांच्यासोबत स्पर्धा करण्यासाठी नागरी सहकारी बँकांमधील प्रशासन सुदृढ करण्यावर भर देण्यात येत असल्याचे शहा यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच तांत्रिक नावीन्यपूर्ण संशोधन अंगीकारण्यासाठी देशपातळीवर एका समितीची स्थापना देखील करण्यात आली आहे. सहकाराच्या विकासासाठी केंद्र सरकारने सहकार विभागाची स्थापना केली असून या माध्यमातून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAmit Shahअमित शाहbankबँक