भोर पंचायत समितीमध्ये महिला सखी कक्षाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:11 IST2021-03-09T04:11:18+5:302021-03-09T04:11:18+5:30
भोर पंचायत समितीमध्ये दुसऱ्या मजल्यावर पशुसंर्वधन विभागाजवळ सखी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन सभापती दमयंती जाधव यांच्या ...

भोर पंचायत समितीमध्ये महिला सखी कक्षाची स्थापना
भोर पंचायत समितीमध्ये दुसऱ्या मजल्यावर पशुसंर्वधन विभागाजवळ सखी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
त्याचे उद्घाटन सभापती दमयंती जाधव यांच्या हस्ते झाले. या वेळी गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, सहायक गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे, गटशिक्षणाधिकारी
श्रीमती सोनवणे, प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती
साबणे, पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.
महिला या आज पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत त्यांना मासिक पाळी दरम्यान हे काम करावे लागत असताना त्यांना अनेक शारीरिक त्रास तसेच मानसिक बदलवातून जावे लागते. अशा वेळी या काळात होणारा त्रास कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने पंचायत समितीमध्ये महिलांसाठी सखी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. या कक्षात यांना मासिक पाळी दरम्यान आराम करता येणार आहे. कक्षामध्ये महिलांसाठी तक्रार पेटी ठेवण्यात येणार आहे. या कक्षात टेबल, बेड, सोफा, खुर्ची, फॅन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. प्रथम उपचार पेटी व संगणक देखील असणार आहे. या कक्षात स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक बचत गट किंवा दुकानदारांच्या मदतीने कक्षात खाद्यपर्दाथ उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
- भोर पंचायत समितीत सखी कक्षाचे उद्घाटन करताना सभापती दमयंती जाधव गटविकास आधिकारी विशाल तनपुरे