शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांची वज्रमूठ, महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीची केली स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 19:39 IST

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रातील सुमारे ८० हून अधिक संघटनांचे पदाधिकारी तसेच शिक्षक व पदवीधर आमदारांनी एकत्रित येत रविवारी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीची स्थापना केली आहे.

पुणे : राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रातील सुमारे ८० हून अधिक संघटनांचे पदाधिकारी तसेच शिक्षक व पदवीधर आमदारांनी एकत्रित येत रविवारी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध चुकीच्या धोरणांविरोधात लढा उभारण्याचा निर्धारही करण्यात आला.पुण्यात आयोजित शिक्षण हक्क परिषदेमध्ये ही समिती स्थापन करण्यात आली आहे. परिषदेमध्ये आमदार विक्रम काळे, दत्तात्रय सावंत, डॉ. सुधीर तांबे, बाळाराम पाटील, निरंजन डावखरे, अपूर्व हिरे यांच्यासह विजय नवल पाटील, संभाजीराव थोरात, रावसाहेब आवारी, शिवाजी खांडेकर, भाऊसाहेब चासकर, मधुकर काठोळे तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध ८० हून अधिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. परिषदेमध्ये झालेल्या निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. समितीचे समन्वयक म्हणून विविध संघटनांच्या पाच जणांची निवड करण्यात आली आहे. यापुढे शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर समितीच्या माध्यमातून लढा उभारला जाणार आहे. त्यानुसार राज्यभरात ठिकठिकाणी मोर्चा, आंदोलन केले जाणार असून त्याअंतर्गत पहिले आंदोलन १२ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर होणार आहे.काळे म्हणाले, समितीमध्ये कोणतेही पक्षीय राजकारण न आणता सर्व संघटनांना एकत्रित करण्यात आले आहे. सध्या शिक्षण क्षेत्रात अनेक गंंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. १३०० शाळा बंद करण्यात आल्या असून आणखी ८० हजार शाळा बंद करण्याचे बेताल वक्तव्य शिक्षण सचिवांनी केले आहे. अनेक वर्षांपासून शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांची भरती बंद आहे. शाळा व्यवस्थापन कोलमडले आहे. अशा अनेक प्रश्नांवर राज्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत विविध संघटनांना एकत्रित आणण्यात आले आहे. कृती समितीच्या माध्यमातून भविष्यात शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणाविरोधात लढा उभारला जाईल. या लढ्यामध्ये शिक्षणाव्यतिरिक्त शासनाच्या विविध विभागाच्या संघटनांनाही सहभागी करून घेतले जाईल. त्यासाठी प्रत्येक महसुली विभागात स्वतंत्र बैठक घेतली जाणार आहे. राज्य कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांशी ३० जानेवारी रोजी चर्चा केली जाणार आहे.------------शिक्षण सचिव हटावचा नाराराज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याबाबतच्या शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या वक्तव्याचा परिषदेत निषेध करण्यात आला. शिक्षण सचिव परस्तर असे धोरण ठरवत आहेत. ते अमराठी असल्याने मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचे षडयंत्र आहे. त्यामुळे येत्या अधिवेशनात त्यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली जाईल. तसेच शिक्षण सचिव हटावचा नाराही दिला जाणार असल्याचे विक्रम काळे यांनी स्पष्ट केले.-------------सर्व आमदारांना देणार निवेदनकृती समितीच्या माध्यमातून शिक्षणातील विविध प्रश्नांबाबत राज्यातील सर्व आमदारांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक आमदाराला याबाबत निवेदन देऊन आगामी अधिवेशनात आवाज उठविण्याचे आवाहन केले जाईल. सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांचीही भेट घेतली जाणार आहे. यामध्ये कोणतेही पक्षीय राजकारण आणले जाणार नाही, असा निर्णय शिक्षण हक्क परिषदेत घेण्यात आला.

टॅग्स :Teacherशिक्षक