गावातील विविध क्षेत्रातील महिलांनी एकत्र येत हिरकणी महिला प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांनी दिला. महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शीतल विक्रांत दोरगे, उपाध्यक्षा सीमा उमेश दिवेकर व सचिव दीपाली अमित दोरगे यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली. वर्षा दोरगे, सारिका यादव, योगिता खैरे, अर्चना दोरगे, शीतल मलभारे, अंकिता शिंदे, उषा शितोळे, वैशाली कांबळे, मनीषा फेरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
यावेळी दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून हळदीकुंकू समारंभास सुरुवात करण्यात आली. डॉ. प्रीती शाम कुलकर्णी यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली होती. सुनीता काटम यांनी ग्रामीण भागातील महिलांनी खंबीर राहण्याबाबत मार्गदर्शन केले. क्रांती शहा यांनी रांगोळी विषयक माहिती दिली. दीपाली चांदगुडे यांनी छोट्या छोट्या ब्युटी टिप्स महिलांना दिल्या. चंदाराणी मोटे यांनी महिलांना आरोग्यदायी जीवनाच्या टिप्स दिल्या.
प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शीतल दोरगे यांनी प्रतिष्ठानबद्दल उपस्थित महिलांना माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी गावातील महिलांच्या एकीकरणासाठी प्रतिष्ठानची संघटना उभी केली आहे. प्रतिष्ठानच्या मार्फत बचत गट, योगा वर्ग, सखी संवाद, जेष्ठ नागरिक संवाद आदी उपक्रम राबविणार आहे. उखाणा कार्यक्रम व वाण वाटप वर्षा शेखर दोरगे व योगिता खैरे यांनी केला.
फोटो ओळ :- यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात हिरकणी महिला प्रतिष्ठान स्थापन कार्यक्रमात उपस्थित महिला..