बारामतीत अस्थापना चालक, मालक, दुकानदार,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST2021-06-16T04:13:58+5:302021-06-16T04:13:58+5:30

बारामती : बारामती नगरपरिषद हद्दीतील सर्व अस्थापनांमधील दुकानदार, मालक, विक्रेते, कामगार यांना दर पंधरा दिवसांनी आता कोरोना आरटीपीसीआर ...

Establishment drivers, owners, shopkeepers, | बारामतीत अस्थापना चालक, मालक, दुकानदार,

बारामतीत अस्थापना चालक, मालक, दुकानदार,

बारामती : बारामती नगरपरिषद हद्दीतील सर्व अस्थापनांमधील दुकानदार, मालक, विक्रेते, कामगार यांना दर पंधरा दिवसांनी आता कोरोना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

बारामती नगरपरिषदेच्या नगरपरिषद उपमुख्याधिकारी पद्मश्री दाईंडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार: नगरपरिषद हद्दीतील सर्व प्रभागामध्ये कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यासाठी आस्थापनातील सर्व मालक, विक्रेते (सेल्समन), इतर कर्मचारी यांची आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर चाचणी अहवाल जवळ ठेवण्यात यावा. अ‍ॅंटिजेन चाचणी केलेली असली, तरी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. सदरची तपासणी पंधरा दिवसांकरिता ग्राह्य असल्याने दर पंधरा दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी. रयत भवन (मार्केट यार्ड, इंदापूर रस्ता) या ठिकाणी सकाळी १० ते ४ या वेळेत उपजिल्हा रुग्णालय, बारामती यांच्यामार्फत मोफत आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे.

-------------------

टेस्ट केली नाही, तर कारवाई अटळ

कोविड-१९ अनुषंगाने आपले दुकान, मॉल, आस्थापनाची तपासणीसाठी येणारे नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांना संबंधित सर्वांचे आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट दाखविणे बंधनकारक आहे. सर्व आस्थापनांनी या सूचनेचे कटाक्षाने पालन करावे. अन्यथा आपले दुकान, संबंधित आस्थापना पुढील सात दिवसांकरिता सीलबंद करण्यात येईल. तसेच या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अन्वये कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरपरिषद उपमुख्याधिकारी पद्मश्री दाईंगडे यांनी दिली.

-------------------------

Web Title: Establishment drivers, owners, shopkeepers,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.