दौंडला लोकशासन पक्षाच्या शाखेची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:09 IST2021-03-19T04:09:55+5:302021-03-19T04:09:55+5:30

लोकशासन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या शाखेची स्थापना करण्यात आली आहे. या वेळी लोकशासन पक्षाच्या नामाफलकाचे उद्घाटन करण्यात ...

Establishment of Daundla Lokshasan Party branch | दौंडला लोकशासन पक्षाच्या शाखेची स्थापना

दौंडला लोकशासन पक्षाच्या शाखेची स्थापना

लोकशासन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या शाखेची स्थापना करण्यात आली आहे. या वेळी लोकशासन पक्षाच्या नामाफलकाचे उद्घाटन करण्यात आले. पुणे जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा ज्योती गायकवाड यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी ज्योती गायकवाड म्हणाल्या की, लोकशासन पक्ष संपूर्ण राज्यात कार्यरत असून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून केले जाते. सामाजिक कार्यकर्त्या कांचनमाला धेंडे म्हणाल्या, की समाजातील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी आणि अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी लोकशासन पक्षाच्या माध्यमातून कामकाज केले जाईल, असे सांगून धेंडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी विकास गायकवाड, आकाश साळवे, दत्तु लोढे, शीतल बारगीर, वर्षा साळवे आदी उपस्थित होते.

१८ दौंड

Web Title: Establishment of Daundla Lokshasan Party branch