अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना नाही "टेस्ट"चे बंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:10 AM2021-04-18T04:10:39+5:302021-04-18T04:10:39+5:30

पुणे : पालिकेने शहरात १४ एप्रिलच्या रात्रीपासून लागू केलेल्या संचारबंदी आणि निर्बंधांमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात सूट दिली ...

Essential service personnel are not required to take the "test" | अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना नाही "टेस्ट"चे बंधन

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना नाही "टेस्ट"चे बंधन

Next

पुणे : पालिकेने शहरात १४ एप्रिलच्या रात्रीपासून लागू केलेल्या संचारबंदी आणि निर्बंधांमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात सूट दिली आहे. अत्यावश्यक सेवा पुरवणारे खाजगी वाहन चालक, हॉटेल, रेस्टॉंरंटमधील कर्मचारी, घरगुती काम करणारे कामगार तसेच वृत्तपत्र व्यवसायाशी संबंधित कर्मचारी, वितरण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याचा नियम शिथिल करण्यात आला आहे. मात्र, लसीकरण अत्यावश्यक असल्याचे पालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

राज्य शासनाने अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश केलेल्या ई कॉमर्स मार्फत घरपोच सेवा देणारे कर्मचारी, हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांचे कर्मचारी, घरपोच सुविधा देणारे कर्मचारी, खासगी वाहन चालक, मालक, वर्तमानपत्रे, नियतकालिके, मासिके, साप्ताहिकांची छपाई व वितरण करणारे कर्मचारी, घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वंयपाकी, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना सेवा देणारे वैद्यकीय मदतनीस , नर्स यांना कोरोनाची आरटीपीसीआर, अँन्टीजेन चाचणी केल्याचा १५ दिवसांचा वैध दाखला बंधनकारक केलेला होता.

या नियमात बदल करण्यात आला असून पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नव्याने काढलेल्या आदेशात या कर्मचाऱ्यांना या चाचणीमधून सूट देण्यात आली आहे. परंतु, किराणा विक्रेत्यांना ही चाचणी बंधनकारक आहे.

-----

१. विकेंड लॉकडाऊनमध्येही खानावळीतून आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते संंध्याकाळी ८ वाजेपर्यंत पार्सल सेवा देण्यास अनुमती.

२. अत्यावश्यक सेवेमध्ये चष्म्याच्या दुकानांचा समावेश. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ही दुकाने सुरू ठेवता येणार.

------

वाईन शॉपमधून पार्सल सेवा

पालिका आयुक्तांनी यापूर्वी काढलेल्या आदेशात बार-रेस्टॉरंटमधून मद्य पार्सल सुविधेद्वारे पुरविता येणार असल्याचे नमूद केले होते. मात्र, त्या आदेशात वाईन शॉपचा उल्लेख नसल्याने दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच आम्हालाही पार्सल सुविधा देण्याची अनुमती द्यावी अशी मागणी केली होती. आयुक्तांनी काढलेल्या सुधारीत आदेशांमध्ये दारू विक्रीच्या दुकानांतून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे होम डिलिव्हरी सुविधा देण्यास परवानगी दिली आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत ही सेवा देता येणार आहे.

-----

रमजान महिन्यासाठी नियमावली

१. मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार, धार्मिक कार्यक्रम घरातच करावेत. नमाज

पठणाकरिता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. तसेच शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण( अलविदा जुम्मा) सुद्धा घरातच करावे.

२) शब-ए-बदर ही पवित्र रात्रीही कुराण पठण व नफील नमाज घरातच अदा करावेत.

३) सेहरी व इफ्तारच्या वेळी फळ, अन्नपदार्थ विक्रेते यांची गर्दी होऊ नये याची क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त व पोलिसांनी खबरदारी घ्यावी.

४) सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येऊ नये. सुरक्षित अंतर,

स्वच्छतेच्या नियमांचे (मास्क व सॅनिटायझर इत्यादी) पालन करावे.

५) कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक,

सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.

Web Title: Essential service personnel are not required to take the "test"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.