शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

सांस्कृतिक ज्ञानकोशातून उलगडतेय महाभारताचे सार..! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 17:02 IST

महाभारतातील कथा, प्रसंग, घटना आपण विविध माध्यमांतून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतात..

ठळक मुद्देनद्या, पर्वते, तीर्थस्थाने आणि शस्त्रास्त्रे या विषयांची सूची संकलित

- प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : सांस्कृतिक ज्ञानकोशाच्या माध्यमातून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने महाभारताविषी सविस्तर आणि साधार माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. महाभारतातील भौैगोलिक, राजकीय, अर्थशास्त्रीय वैैशिष्टये, कला, वास्तूशास्त्र, संस्कृती या कोशामधून अधोरेखित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभ्यासक प्रा. ग. उ. थिटे संपादकपदाची धुरा सांभाळत आहेत. सांस्कृतिक ज्ञानकोशाच्या पहिल्या दोन खंडांत महाभारतामध्ये उल्लेख असलेल्या भौगोलिक भागातील नद्या, पर्वते, तीर्थस्थाने आणि शस्त्रास्त्रे या विषयांची सूची संकलितकरण्यात आली आहे. सध्या तिसऱ्या खंडाचे काम सुरु आहे. व्यक्तिविशेष या खंडातील पहिल्या दोन भागांमध्ये अ पासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्तिरेखांची सूची संकलित करणत आली आहे. लोकमतशी बोलताना डॉ. थिटे म्हणाले, महाभारतातील कथा, प्रसंग, घटना आपण विविध माध्यमांतून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतात. आपल्याकडे मोघम माहिती असते. मात्र, या घटना महाभारतात नेमकेपणाने कोठे मांडलेल्या आहेत, कथेचे तपशील याबद्दल विवेचन करण्यात येत आहे. संस्कृतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सर्व मुद्दयांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. अनेक उपखंड मिळून एक खंड तयार होईल आणि कामाच्या विस्तारानुसार, खंडांची संख्या ठरु शकेल, असेही त्यांनी नमूद केले.----------------

व्यक्तिविशेष भाग :

व्यक्तिविशेष भागामध्ये काही ठिकाणी शंकर, विष्णू यांची सहस्त्रनामावली देण्यात आलेली आहे. यामुळे कोणता शब्द मूळ ग्रंथात कोठे आणि किती वेळा आलेला आहे, याचीही माहिती मिळू शकेल. यामुळे अभ्यासकांची सोय होणार आहे. अक्षरानुसार, व्यक्तीरेखांची यादी करत जाऊच; मात्र, काही व्यक्तींना एकाहून अधिक नावे आहेत. उदाहरणार्थ, अजुनार्चा उल्लेख काही ठिकाणी धनंजय, तर काही ठिकाणी पार्थ असा आहे. महाभारतातील अधिविशेषणे यामध्ये संकलित करण्यात आली आहेत. किती आणि कोणकोणती नावे, विशेषणे आणि अधिविशेषणे किती ठिकाणी, कशी वापरली आहेत, याचे संकलन हाच कोशाचा मूळ उद्देश आहे. विखुरलेली माहिती एकत्रित करण्यात येत आहे.

------------------

चिकित्सित आवृत्ती - हा कोश तयार करण्याआधी भांडारकर संस्थेने महाभारताची चिकित्सित आवृत्ती तयार करण्याचे मोठे काम पूर्ण केले आहे. भारताच्या विविध भागांमध्ये महाभारताची विविध रुपे हस्तलिखितांच्या स्वरुपात आपल्याला दिसतात. त्यांचा तपशीलवार अभ्यास करुन, अधिकृत भाग निर्धारित करुन चिकित्सित आवृत्ती तयार करण्यात आली. त्या पायावरच हा पुढील प्रकल्पाचा डोलारा उभा राहत आहे. महाभारताच्या सांस्कृतिक ज्ञानकोश तयार झाल्यानंतर त्यावर निबंध, संशोधनपर प्रबंध लिहिले जाऊ शकतात. महाभारताच्या चिकित्सित आवृत्तीच्या इंगह्यजी अनुवादाचे कामही सध्या सुरु आहे. भावी योजनांमध्ये विविध प्रकारच्या अनुवादाचा समावेश असेल.  

टॅग्स :Puneपुणेbhandarkar institute puneभांडारकर संशोधन संस्था, पुणे