शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Pune: ससूनमधून पळालेला मार्शल सापडला; मावशीच्या घरी आला होता आश्रयाला

By नितीश गोवंडे | Updated: February 17, 2024 15:56 IST

शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ धमकी प्रकरणातील तो आरोपी आहे...

पुणे : ससून रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीला अखेर सायबर पोलिसांनी पकडले. शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ धमकी प्रकरणातील तो आरोपी आहे. शुक्रवारी (दि. १६) रात्री तो मावशीच्या घरी आश्रयाला आला होता. मात्र पोलिसांनी आधीपासूनच मावशीच्या घरी सापळा रचून ठेवला होता. सायबर पोलिसांचे एक पथक मावशीच्या घरात तर दुसरे घराच्या बाहेर पहारा देत होते. तो घरात येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. मार्शल लुईस लिलाकर असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.

ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता मार्शलने तेथून पळ काढला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात मार्शल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर कर्तव्यात हलगर्जी केल्यामुळे सायबर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले होते.

धमकी दिल्याप्रकरणी स्वाती मोहोळ यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार आकुर्डी येथे रहाणार्‍या मार्शल लिलाकर याला अटक करण्यात आली. त्याने मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने सोशल मीडियावर खाते उघडून धमकी दिली होती. दरम्यान ९ फेब्रुवारी मार्शल याला ताब्यात घेण्यात आल्यावर, १० दहा फेब्रुवारी रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला १३ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान ११ फेब्रुवारी रोजी रात्री छातीत दुखत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान दोन्ही कर्मचार्‍यांची नजर चुकवून मार्शलने तेथून धुम ठोकली होती. त्याच्या शोधार्थ गुन्हे शाखा, सायबर पोलीस आणि बंडगार्डन पोलिसांची पथके होती.

तपास सुरू असताना, पळ काढलेला आरोपी मार्शल गेलेला १२ फेब्रुवारी रोजी आकुर्डी परिसरात येऊन गेला. मात्र तो स्वत:च्या घरी न येता मित्राच्या घरी गेला. त्याने मित्राच्या वडिलांकडे पैसे मागितले. मात्र त्यांच्या खिशात फक्त १३० रुपये होते. हे पैसे घेऊन तो निघून गेला. एका ठिकाणी तो सीसीटीव्हीमध्ये दिसत होता. मात्र त्यानंतर तो मुख्य रस्त्याने न जाता गल्ली बोळातून फिरत असल्याने तसेच त्याच्याजवळ मोबाईल नसल्याने माग काढणे अवघड जात होते. दरम्यान तो शुक्रवारी रात्री थकून भागून मावशीच्या घरी आला. त्याच्याकडे पैसे नव्हते तसेच लपण्याचे पर्यायही संपले होते. यामुळे तो अलगदच पोलिसांच्या तावडीत सापडला. पुढील कारवाईसाठी त्याला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :sasoon hospitalससून हॉस्पिटलPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी