कोठडीतून दोघांचे पलायन

By Admin | Updated: April 10, 2017 02:39 IST2017-04-10T02:39:13+5:302017-04-10T02:39:13+5:30

खून प्रकरणातील दोन आरोपींनी खडकी पोलीस स्टेशनच्या कोठडीतून रविवारी पहाटे खिडकीचे गज कापून, जाळी उचकटवून पलायन केले.

The escape of the duo | कोठडीतून दोघांचे पलायन

कोठडीतून दोघांचे पलायन

पिंपरी चिंचवड : खून प्रकरणातील दोन आरोपींनी खडकी पोलीस स्टेशनच्या कोठडीतून रविवारी पहाटे खिडकीचे गज कापून, जाळी उचकटवून पलायन केले.
टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने योगिराज शिवराज खंडागळे या तरुणाचा १२ दिवसांपूर्वी खून झाला. या प्रकरणातील सात आरोपींना ३ एप्रिलला खडकी पोलिसांनी गुलबर्गा, कर्नाटक येथून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. सोमवारी कोठडीची मुदत संपणार होती, मात्र ९ एप्रिलला पहाटे दोन आरोपींनी खिडकीचे गज वाकवुन, तारेची जाळी उचकटून कोठडीतून पलायन केले.
खडकी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेल्या आरोपींमध्ये सिराज अल्लाद्दीन अमीर कुरेशी (वय ४०,रा. खडकी), सनी विजय अ‍ॅन्डी (वय २५, धानोरी विश्रांतवाडी) यांचा समावेश आहे. पोलिसांनी या दोन आरोंपींसह सनी ज्ञानेश्वर तायडे, योगेश उर्फ बालसुब्रह्मण्यम पिल्ले, रॉकी उर्फ डम्पी फ्रान्सीस मोती, आकाश दत्ता चांदणे, प्रकाश लिंग्या राठोड, आरिफ रियाज घोडेस्वार यांना ३ एप्रिलला पोलीस कोठडीत ठेवले होते. त्यांच्याबरोबरच्या ६ अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले होते. या आरोपींपैकी दोनजण पसार झाले. खडकी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणारे पोलीस अधिकारी बाजीराव चिमन ठोंबरे यांनी या घटनेची फिर्याद नोंदवली आहे. आरोपी पळून गेल्याने संबंधित
पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास भोसले तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The escape of the duo