वानवडीतील शिवरकर, शाहू दवाखाना सुसज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:18 IST2021-03-04T04:18:37+5:302021-03-04T04:18:37+5:30

तांत्रिक अडचणीमुळे पोर्टलवरील नोंदणीत अडचणी वानवडी : वानवडीतील महापालिकेच्या कै. नामदेव गेणूजी शिवरकर व छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात कोरोना ...

Equipped with Shivarkar, Shahu Dispensary in Wanwadi | वानवडीतील शिवरकर, शाहू दवाखाना सुसज्ज

वानवडीतील शिवरकर, शाहू दवाखाना सुसज्ज

तांत्रिक अडचणीमुळे पोर्टलवरील नोंदणीत अडचणी

वानवडी : वानवडीतील महापालिकेच्या कै. नामदेव गेणूजी शिवरकर व छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. लसीकरणासाठी लागणारी पूर्व तयारी याठिकाणी करण्यात आलेली आहे. तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी होण्यास अडचण निर्माण होत आहे.

याप्रसंगी भागातील लोकप्रतिनिधी रत्नप्रभा जगताप, कलिंदा पुंडे, प्रशांत जगताप, लक्ष्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पुंडे उपस्थित होते.

वानवडी भागातील नगरसेविका रत्नप्रभा जगताप व कालिंदा पुंडे यांना शिवरकर, तर केदारी नगर भागातील ज्येष्ठ नागरिक अजित परमार यांना शाहू रुग्णालयात लस दिली असल्याचे क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी मनीषा सुलाखे यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक, तसेच ४५ पेक्षा जास्त वय असल्यास व प्रकृती गंभीर असणाऱ्या व्यक्तीस मोफत लस दिली जाणार आहे. बुधवारी सकाळी दोन्ही लसीकरण केंद्र सुरू झाली आहेत. शिवरकर दवाखान्यात इतर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची सेवा तसेच प्रसूतिगृह सुरूच राहणार असून लसीकरणासाठी वेगळा विभाग असल्याचे वैद्यकीय अधिकारी दीप्ती बच्चाव यांनी सांगितले.

या प्रसंगी विभागीय वैद्यकीय अधिकारी दिनेश बेंडे, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी मनीषा सुलाखे, वैद्यकीय अधिकारी दीप्ती बच्चाव, लाटणे तसेच कनिष्ठ अभियंता चैतन्य दीक्षित, आरोग्य विभागातील सेवक वर्ग, नर्स, वैद्यकीय सेवक आदी उपस्थित होते.

फोटो : शिवरकर दवाखान्यात लसीकरणासाठी करण्यात आलेला विभाग.

Web Title: Equipped with Shivarkar, Shahu Dispensary in Wanwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.