सायकल प्रवासात पर्यावरणाचा प्रसार

By Admin | Updated: November 14, 2016 03:10 IST2016-11-14T03:10:22+5:302016-11-14T03:10:22+5:30

पर्यावरण संवर्धन, सामाजिक सलोखा यांचा प्रसार करीत दिल्ली ते पुणे असा १५३० किलोमीटरचा प्रवास करून स्वानंद ग्रुपचे ६ सायकलस्वार पुण्यात दाखल

Environmental propagation on bicycle journeys | सायकल प्रवासात पर्यावरणाचा प्रसार

सायकल प्रवासात पर्यावरणाचा प्रसार

पुणे : पर्यावरण संवर्धन, सामाजिक सलोखा यांचा प्रसार करीत दिल्ली ते पुणे असा १५३० किलोमीटरचा प्रवास करून स्वानंद ग्रुपचे ६ सायकलस्वार पुण्यात दाखल झाले. महापौर प्रशांत जगताप, शिवसेना शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी त्यांचे शनिवारवाड्यावर स्वागत केले.
नगरसेवक चंद्रशेखर निम्हण, शिवराज मानकर, मनोज शहा, मनोज मेहता, राजीव शहा, ऋषीकेश शहा हे सायकलस्वार प्रवासात सहभागी झाले होते. दिल्ली ते पुणे हा प्रवास त्यांनी ११ दिवसांत पूर्ण केला. दिल्लीतील इंडिया गेटपासून सायकल प्रवासाला सुरुवात झाली. महिपालपूर-अलवार-दाऊसा-सवाई माधोपूर-कोटा-सोयात कलाण- उज्जैन-धामनोड-शिरपूर-मनमाड संगमनेर-गुंजाळवाडीमार्गे सर्व पुण्यात पोचले. प्रवासादरम्यान पर्यावरणरक्षणाची जनजागृती करणारी पत्रके वाटली.

Web Title: Environmental propagation on bicycle journeys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.