शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पर्यावरणाचा संदेश, झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 00:36 IST

शारदाबाई पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिवनगरच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी १ मीटर व्यासाची राखी झाडाला बांधून रक्षाबंधन साजरे केले.

सांगवी : शारदाबाई पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिवनगरच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी १ मीटर व्यासाची राखी झाडाला बांधून रक्षाबंधन साजरे केले. निसर्गामध्ये झाड किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते, त्याची किती आवश्यकता आहे. याची जाणीव सर्वांनाच आहे. प्रत्येक झाड जगले पाहिजे, झाडाचे संवर्धन झाले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य व्ही. पी. पवार यांनी केले. या वेळी सजीव सृष्टीचे रक्षण करणाऱ्या निसर्गाला मानवजातीच्या रक्षणाचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थिनींनी झाडाला राखी बांधून भाऊ मानून, तुझी आम्हाला गरज असल्याचे मत व्यक्त केले.

राष्ट्रीय हरित सेना विभाग शारदाबाई पवार महाविद्यालयामार्फत असे विविध उपक्रम हाती घेऊन निसर्ग संवर्धनाविषयी जनजागृती करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात येतो. राष्ट्रीय हरित सेना विभागामार्फत झालेल्या या रक्षाबंधनाप्रसंगी प्राचार्य व्ही. पी. पवार, उपप्राचार्य एम. एस. सोनवलकर, पर्यवेक्षक उत्तम तावरे, हरित सेनेचे एस. एस. माने, मार्गदर्शक एन. डी. कुंभार, ए. व्ही. काटे, सी. बी. जगताप, एच. एन. जगताप,शिक्षक प्रतिनिधी आर. व्ही. माळवदे उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी झाडांना बांधल्या राख्याकाºहाटी : येथे वसतिगृह विद्यालयात विद्यार्थी- विद्यार्थिनींनी वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधनाचा दिवस साजरा केला. भविष्यात मानवाच्या रक्षणासाठी जीवसृष्टी वाचवण्याची गरज असल्याने व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वटवृक्ष लागवड करून व असणाºया झाडांची काळजी घेऊन त्यांचे रक्षण करण्याची गरज आहे. वृक्षांचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थी व शिक्षकांनी वृक्षांना राख्या बांधण्याचा आगळावेगळा उपक्रम साजरा केला. यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य यू. एम. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मानवाचे रक्षण करणाºया निसर्गाचे रक्षण करण्याचे आवाहन केले. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनPuneपुणेenvironmentवातावरण