शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस शिक्षक भरतीत ईडीची एन्ट्री, मुंबईत होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 05:55 IST

फिर्यादींची होणार २ ऑगस्टला मुंबईत चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : खासगी अनुदानित शाळांमध्ये बोगस शिक्षक भरतीप्रकरणी दाखल गुन्ह्यात आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) स्वत:हून दखल घेतली आहे. त्यानुसार याप्रकरणी असलेले फिर्यादी जिल्हा परिषदेचे  शिक्षण विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना चौकशीसाठी २ ऑगस्ट रोजी मुंबईला बोलावले आहे. याची व्याप्ती सुमारे ५० कोटींची असण्याची शक्यता असून, यात मनी लॉँड्रिंगचे प्रकरण घडल्याचा संशय आहे. 

आकुर्डी येथील एका शिक्षण संस्थेत बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक भरती करण्यात आली होती. त्यामध्ये अनेक शिक्षणाधिकाऱ्यांनी संगनमत करून २३ शिक्षकांची बोगस भरती केल्याचे आढळले होते. आरोपींमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, दत्तात्रय शेंडकर, पुणे महापालिकेचे माजी शिक्षणाधिकारी रामचंद्र जाधव, तसेच प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी व संस्थाचालकांचाही समावेश आहे. या शिक्षण संस्थेने उरुळीकांचन येथील त्यांच्या संस्थेत काही शिक्षकांची बोगस भरती केल्याचे दाखविले. राज्य सरकारकडून त्यांचे पगार काढले. त्यानंतर काही वर्षांनी त्याच शिक्षकांना पुन्हा आकुर्डी येथील संस्थेत समाविष्ट केले. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी चौकशी केली होती. त्यात हा गैरप्रकार उघडकीस आला. त्यात १९ ऑक्टोबर २०१९ रोजी भुजबळ यांनी बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनुसार २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये काहींनी उच्च न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मिळविला. काहींना अटक करण्यात आली होती. चौकशीत काही ठिकाणी पोलिसांनी काही कागदपत्रे, तसेच बनावट शिक्के जप्त केले. त्यामध्ये शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यतेबाबतचे लेटरपॅड, तसेच नियुक्तीची पत्रे आढळली आहेत. 

मनी लाँड्रिंगचा संशय हे प्रकरण मनी लाँड्रिंगचे असल्यावरून ईडीने भुजबळ यांना नोटीस पाठविली. त्यानुसार २ ऑगस्टला त्यांना चौकशीसाठी बोलाविले आहे. किती शिक्षकांची भरती झाली, त्यातून किती मनी लॉँड्रिंग झाले किंवा कसे याबाबत विचारणा केली जाणार आहे, असे ईडीने नोटिसीत म्हटले आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयTeacherशिक्षक