शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

महापालिकेच्या पाच कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही प्रवेश बंदी;दिव्यांग प्रतिनिधीचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:06 IST

- ओंकार कदमची पाठराखण करणाऱ्यांवरही संक्रात; महिला अधिकारी मानसीक त्रास प्रकरण

- हिरा सरवदेपुणे - महापालिकेतील महिला अधिकाऱ्यास जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिल्याप्रकरणी महापालिका भवन व महापालिकेच्या मिळकींमध्ये प्रवेशबंदी केलेले भाजपच्या कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम यांची पाठराखण करणाऱ्या आणखी सहा जणांवर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेच्या पाच कंत्राटी कर्मचाऱ्यांसह एका दिव्यांग प्रतिनिधीचाही समावेश आहे. हे सर्व कदम यांचे कार्यकर्ते म्हणून महापालिकेत आले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ओंकार कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी १७ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या आरोग्य विभागात जमावाने येऊन महिला अधिकाऱ्यांचे चित्रीकरण करून दमदाटी केली. तसेच त्यांना कार्यालयाच्या बाहेर जाण्यास मज्जाव केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संबंधित महिला अधिकाऱ्याने सुरक्षा विभागासह भाजपच्या नेत्यांकडे कदम यांची तक्रार केली होती. तसेच महापालिकेच्या अंतर्गत तक्रार समितीकडेही तक्रार केली होती. त्यानंतरही कदम यांच्याकडून त्रास देणे सुरूच होते. त्यामुळे संबंधित महिला अधिकाऱ्याने थेट राज्य महिला आयोगाकडेच तक्रार केली. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी या प्रकरणाची गांभीर देखल घेत ओंकार कदम, अक्षय कांबळे यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांना महापालिका भवन व महापालिकेशी संलग्न मिळकतींमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.दरम्यान, ओंकार कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परवानगी न घेता महापालिकेतील पत्रकार पक्षात पत्रकार परिषद घेतली. यासाठी २५ ते ३० लोकांचा जमाव जमवला, महापालिकेसमोरील हिरवळीवर फेसबुक लाईव्ह करून संबंधीत महिला अधिकाऱ्यावर आरोप करून धमकी दिली, असा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच कदम यांच्या समवेत कार्यकर्ते म्हणून उपस्थित राहणारे विशाल जाधव, रेखा ससाणे, सविता पवार, रेश्मा चिल्लाळ, सारिका गोरड या महापालिकेच्या पाच कंत्राटी कर्मचाऱ्यांसह मिना धोत्रे या दिव्यांग प्रतिनिधीवरही प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे.यासंदर्भात महापालिकेच्या सुरक्षा विभागाने शिवाजीनगर पोलिसांना पत्राद्वारे प्रवेशबंदी केलेल्यांची नावे कळवली आहेत. तसेच त्यांना पोलिस ठाण्यामध्ये बोलावून त्यांच्यावरील कारवाईची माहिती द्यावी, अशी विनंती केली आहे. तसेच १७ फेब्रुवारी ते ६ जून या कालावधीतील महापालिकेतील सीसीटीव्ही फुटेज महापालिका पोलिसांना उपलब्ध करून देईल. त्यामध्ये दिसणाऱ्यांना पोलिस ठाण्यात बोलावून प्रवेशबंदीचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या परीणामाची जाणीव करून द्यावी, असेही पत्रात म्हटले आहे.विशाखा समितीसमोर झाली सुनावणी ओंकार कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १७ फेब्रुवारी आरोग्य विभागात घातलेल्या गोंधळानंतर घडलेल्या घडामोडी च्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापालिकेत विशाखा समितीची सुनावणी झाली. यावेळी तक्रार करणाऱ्या दोन महिला अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात आली. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी संबंधीतांवर कारवाई करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड