शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पदवीचे प्रवेशही फक्त सीईटीच्या गुणांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 06:06 IST

व्यावसायिक विषय, एनसीसी, एनएसएसचाही आधार

पुणे : राज्यातील कृषी विद्यापिठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये कृषी पदवी अभ्यासक्रमांना या वर्षीपासून केवळ सीईटीतील गुणांवर प्रवेश दिले जाणार आहेत. बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. यापूर्वी अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांमध्ये केवळ सीईटीच्या गुणांवर प्रवेश मिळत होता. आता त्यात कृषी अभ्यासक्रमांचीही भर पडली आहे.

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी सीईटी सेलमार्फत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. मागील वर्षी पहिल्यांदाच या प्रक्रियेत ‘कृषी’चा समावेश करण्यात आला. पहिलेच वर्ष असल्याने ‘कृषी’साठी बारावीचे ३० टक्के व सीईटीचे ७० टक्के गुण ग्राह्य धरण्यात आले होते. म्हणजे विद्यार्थ्याला बारावीला ७० टक्के गुण असतील तर ३० टक्क्यांप्रमाणे त्याचे २१ गुण आणि सीईटीला ६० टक्के गुण असतील तर त्याचे ७० टक्क्यांनुसार ४२ गुण एकत्रित करण्यात आले. त्यानुसार गुणवत्ता यादीच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी केवळ सीईटीचे गुण ग्राह्य धरण्यात आले. यावर्षी कृषीसाठीही सीईटीचेच गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक (शिक्षण) हरिहर कौसडीकर यांनी दिली.बारावीचे गुण ग्राह्य धरण्यात येणार नसले तरी शेतजमीन (१२ टक्के), बारावीतील व्यावसायिक विषय (१० टक्के), राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा स्पर्धा, वादविवाद, निबंध, वकृत्व या राज्यस्तरीय स्पर्धांचे (२ टक्के) गुण विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळणार आहेत. पुढील वर्षीपासून हे गुणही न देण्याबाबत विचार सुरू आहे. अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांना हे गुण मिळत नाहीत. कृषी पदवीमध्ये प्रवेशासाठी बारावी (विज्ञान) च्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण व खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के गुण अनिवार्य आहेत. प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना या www.mahacet.org संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर  या www.maha-agriadmission.in संकेतस्थळावर प्राधान्यक्रम व इतर माहिती भरायची आहे. प्रवेश प्रक्रियेंतर्गत चार आॅनलाईन प्रवेश फेºया राबविल्या जाणार आहेत.राज्यस्तरीय स्पर्धांचे गुण पूर्वीप्रमाणेचबारावीचे गुण ग्राह्य धरण्यात येणार नसले तरी शेतजमीन (१२ टक्के), बारावीतील व्यावसायिक विषय (१० टक्के), राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा स्पर्धा, वादविवाद, निबंध, वकृत्व या राज्यस्तरीय स्पर्धांचे (२ टक्के) गुण विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळणार आहेत. पुढील वर्षीपासून हे गुणही न देण्याबाबत विचार सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीHSC Exam Resultबारावी निकाल