वृद्धेच्या घरात घुसून दागिने पळविले
By Admin | Updated: January 11, 2015 23:54 IST2015-01-11T23:54:50+5:302015-01-11T23:54:50+5:30
का-हाटी परिसरात भरदिवसा वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने पळविल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

वृद्धेच्या घरात घुसून दागिने पळविले
का-हाटी : का-हाटी परिसरात भरदिवसा वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने पळविल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
काऱ्हाटी (ता. बारामती) येथील गावालगतच हे वाबळे कुटुंब वास्तव्यास आहे.या घरामध्ये शुक्रवारी (दि. ९) दुपारी एकच्या सुमारी दोन चोरटे घुसले. घरातील र्इंदुमती लक्ष्मण वाबळे या शंभरीच्या घरात असलेल्या वृध्द महिलेच्या गळ्यातील एक तोळा सोने असलेली माळ हिसकावून चोरटे पसार झाले. वृध्द महिलेने ओरडण्याचा प्रयत्न केला .मात्र, या महिलेच्या तोंडाला साडी गुंडाळुन मारहाण करण्यात आली.त्यामुळे तिचा अवाज ग्रामस्थांपर्यंत पोहोचला नाही. घरी कोणीही नसल्याचे पाहुन चोरी झाल्याने चोरटे याच भागातील असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही दिवसापूर्वी येथील एका दुकानदाराच्या गळ्यातील सोनसाखळी पळवण्याचा प्रयत्न
झाला होता. (वार्ताहर)