बारामतीत शिक्षण मंडळाची इंग्रजी शाळा

By Admin | Updated: June 13, 2015 04:37 IST2015-06-13T04:37:44+5:302015-06-13T04:37:44+5:30

बारामती नगरपालिकेच्या शिक्षण मंडळामार्फत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याच्या प्रयत्नाला आज यश येणार आहे. आज नगरपालिकेच्या सर्वसाधारण

English School of Baramati Shikshan Mandal | बारामतीत शिक्षण मंडळाची इंग्रजी शाळा

बारामतीत शिक्षण मंडळाची इंग्रजी शाळा

बारामती : बारामती नगरपालिकेच्या शिक्षण मंडळामार्फत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याच्या प्रयत्नाला आज यश येणार आहे. आज नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण मंडळाने सादर केलेल्या संभाव्य वार्षिक ५ लाख ३२ हजार ५०० रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. अंदाज पत्रकात आर्थिक तरतूद नसल्यामुळे शिक्षण मंडळाच्या प्रयत्नाला ‘खो’ बसणार, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. नगरपालिका पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी याबाबत तरतूद करावी, अशी सूचना केली. त्यानुसार आजच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. मागील २ वर्षांपासून शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माधव जोशी, उपाध्यक्ष पराग साळवी, प्रशासन अधिकारी महेश पवार यांनी प्रयत्न केले होते. मात्र, आर्थिक तरतुदीमुळे हा विषय मागे पडत होता. नर्सरी ते एचकेजी पर्यंतचे इंग्रजी माध्यमाचे वर्ग, त्याचबरोबर आठवी ते दहावीचे माध्यमिक विद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण मंडळाने दिला होता. मात्र, सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली नाही.
पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्यात येईल, असे पत्र मुख्याधिकाऱ्यांनी शिक्षण मंडळाला दिले होते.
याबाबत ‘लोकमत’ने ‘अंदाजपत्रकात तरतूद नसल्याने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणे अशक्य; शिक्षण मंडळाच्या प्रयत्नाला खो’ असे वृत्त १९ मे रोजी प्रसिद्ध केले होते.

Web Title: English School of Baramati Shikshan Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.